MB NEWS:व्हॉईस ऑफ मीडियाची परळी तालुका कार्यकारणी जाहीर

 व्हॉईस ऑफ मीडियाची परळी तालुका कार्यकारणी जाहीर




तालुकाध्यक्ष स्वानंद पाटील, कार्याध्यक्ष महादेव गित्ते तर श्रीराम लांडगेंची उपाध्यक्षपदी नियुक्ती



प्रतिनिधी। बीड (पासपोर्ट 3, लोगो)

दि.15 ः राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेची परळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीची घोषणा करण्यात आली. 


या कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी स्वानंद पाटील, कार्याध्यक्षपदी महादेव गित्ते, उपाध्यक्षपदी श्रीराम लांडगे, सरचिटणीसपदी अशोक गलांडे, सहसरचिटणीस-अनिल देशमुख, कोषाध्यक्ष- महादेव शिंदे, कार्यवाहक-संतोष जुजगर, प्रसिद्धी प्रमुख-बालाजी ढगे हे आहेत. तर सदस्य म्हणून संजय खाकरे, रविंद्र जोशी, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, प्रकाश चव्हाण,किरण धोंड,दत्तात्रय काळे हे सर्व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शन करणार आहेत. 


नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडीबद्दल बीड जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रभात बुडूख, कार्यवाहक उदय नागरगोजे, केशव कदम, उपाध्यक्ष अमोल जाधव, जालींदर धांडे, विनोद जिरे, प्रवक्ते गणेश सावंत रांजणीकर, सह सरचिटणीस सुनील यादव, कोषाध्यक्ष अनंत वैद्य, संघटक अनिल जाधव, एजाज शेख, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे,प्रसिध्दी प्रमुख शुभम खाडे,सदस्य संजय तिपाले, शिरीष शिंदे,मुकेश झणझणे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.

-------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !