अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह:आज सायं. 6 : 00 वा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान

 स्व.श्यामरावज देशमुख स्मृतिसमारोह:आज सायं. 6 : 00 वा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान





परळी, दि. 16/01/2023 (प्रतिनिधी)

   येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांचे ' जीवन सुंदर आहे ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.समाज मनातील विकृती बाजूला सारून संस्काराचा दीप प्रज्वलित करत संस्कार करणारे व सकारात्मक विचारांची पेरणी करून जीवन उज्ज्वल करणारे असे हे व्याख्यान आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व

संस्थेचे ज्येष्ठ संचालक,  अनिलराव देशमुख ; सचिव, रवींद्र देशमुख ; कोषाध्यक्ष , प्रा. प्रसाद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य,डॉ. एल. एस. मुंडे; स्मृतिसमारोहाचे समन्वयक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड ,प्रा.कल्याणकर राजश्री ,प्रा. क्षितिजा देशपांडे ,प्रा. डॉ.अरुण चव्हाण,प्रा.विशाल पौळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?