पोस्ट्स

इमेज
  जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद      अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. तसेच इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत अशी भूमिका जाहीर केली आहे.यानंतर राष्ट्रवाद पक्ष कोणाकडे आहे याबद्दल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल तो त्यांना लागू होईल अस
इमेज
  धनंजय मुंडेंनी घेतली दुसर्‍यांदा मंत्रीपदाची शपथ बीड दि. 01 : उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बीडचे धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्री पद मिळाले आहे. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराजबाबा अत्राम यांनी तर पाहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनतर संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. यांना कोणती खाते मिळणार हे रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. तर हे अजित पवार यांचे बंड असल्याचे उघड झाले असून याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ

इमेज
  राष्ट्रवादीचाही गेम : अजित पवारांसह सहकारी घेणार मंत्रीपदाची शपथ मुंबई - अजित पवार यांच्या पुढाकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडत असतांनाच ते आपल्या सहकाऱ्यांसह शपथविधी घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या एकूण नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात माहितीनुसार अजित पवारांसह राष्ट्रवादीचे घडामोडी गतीमान झाल्यानंतर आता राष्ट्रवादीची फुट पडणार असल्याची जवळपास स्पष्ट झालेले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडून राज्यात सत्तांतर घेतले. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात देखील फुट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे राजभवनाकडे निघाले असून त्यांच्यासह नऊ नेते शपथविधी घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे आदींचा समावेश असेल अशी माहिती समोर आली आहे. आजच मंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्य
इमेज
  वेगाने राजकीय घडामोडी: अजितदादा राजभवनात बीड : राज्यात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या असून आजच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात असून बीड जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार उपस्थित असून 'बैठक संपल्यावर अजित पवार राजभवनात जाणार असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येणार असून मागच्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते मात्र यावेळी बीड तील एक नेता मंत्री म्हणून शपथ घेणे मानले जात आहे. त्यामुळे आता नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.

शालेय साहित्य वितरण

इमेज
  मनसेतर्फे कृषीमहर्षी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट येथे साजरी करण्यात आली. मनसेच्या "शिवतीर्थ" कार्यालयात स्व.वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले    तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी लाहान मुलांना वसंतराव नाईक कोण आहेत त्यांना हरीत क्रांतीचे जनक म्हणून का संबोधले जाते या बदल समजावून सांगितल व सेवकराम जाधव सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छां देण्यात आल्या.    या वेळ

आदर्श पायंडा- अनोखा वाढदिवस

इमेज
  वाचनालय सुरु करुन सोपान ताटे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा     परळी (प्रतिनिधी)     बुद्ध फुले आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असणारे भिमनगर येथील सोपान ताटे यांचा वाढदिवस आज 1 जुलै रोजी प्रस्थापित पद्धतीला नाकारून कसलाही ताम धाम न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करून संपन्न करण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सोपान ताटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.        भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कॉम्रेड पी. एस. घाडगे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, भिमनगर वंदना संघाचे संचालक प्रा.विलास रोडे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते भारत ताटे, माजी नगरसेवक नितीन रोडे, काँग्रेस नेते गणपत आप्पा कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.      यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास युवक नेते भारत ताटे यांनी 5000 रुपयाची देणगी जाहीर केली.        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रस्ताविक ॲ
इमेज
  दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने  सोमवारी परळीत गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने उद्या सोमवार दि.3 जुलै रोजी गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी संस्थानच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. येथील हालगे गार्डन, परळी वै. मध्ये असलेल्या प्रशस्त भव्य प्रांगणात सोमवारी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार हा उत्सव साजरा केला जाणार असून सकाळी 9 वा. गुरू पुजन व त्यानंतर धार्मीक कार्यक्रमांना प्रारंभ केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सत्संग, किर्तन, प्रवचन व भजनाचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे.  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मीक सोहळयाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

कंत्राटदार बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल

इमेज
  कंत्राटदार बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      कन्हेरवाडी येथील कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत परळी शहर पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, 30/06/2023 रोजीचे सायंकाळी 18.30 ते दि.01/07/2023 रोजीचे दुपारी 14.00 वाजण्याचे दरम्यान जिरेवाडी बायपास चे प्लॉटवरील पत्र्याचे शेडमध्ये मयत आत्माराम उर्फ बंडू मुंडे हे असताना त्यांचे डोक्यात लोखंडी सी चॅनल मारुन गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले. याबाबत फिर्यादी शिवाजी निवृत्ती मुंडे वय 50 वर्ष व्यवसाय शेती रा. कन्हेरवाडी यांनी फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीत नमुद प्राथमिक संशयावरुन वॉचमन व अन्य एक अशा दोन  संशयीतांविरुद्ध गुरनं. 128/2023 कलम 302,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले,परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  सपोनी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनी सपकाळ, किशोर घटमल,पा

दिव्य मराठीच्या उपक्रमास साद,शाळेत केले तुलशी बीजारोपन

इमेज
  विद्यावर्थीनीच्या विद्यार्थी,शिक्षकांनी केला वृक्षलागवडीचा संकल्प दिव्य मराठीच्या उपक्रमास साद,शाळेत केले तुलशी बीजारोपन परळी (प्रतिनिधी)   पाच जुन जागतिक पर्यावरण दिनी दैनिक भास्करने एक वृक्ष एक जीवन उपक्रम सुरु केल्यानंतर शनिवार दि.1 जुलै रोजी दिव्य मराठीने वृक्षलागवडीचा संदेश देत वृत्तपत्राद्वारे 24 तास ऑक्सीजन देणार्या पवित्र तुलसी चे बियाणे सोबत दिल्यानंतर परळी शहरातील विद्यावर्धीनी विद्यालयात तुलसी बिजारोपन करत वृक्षलागवडीचा संकल्प केला.यावेळी शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या घरी व शेजारील मोकळ्या अंगणात तुलसी लागवड करण्याचा संकल्प केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री उन्मेष मातेकर,सहशिक्षक श्री राजेश्वर नीला,श्री बाळासाहेब हंगरगे, श्री विजय मुंडे,श्री संदीप तिळकरी,श्री अनिल बोतकूलवार,श्री पांडुरंग यादव,सौ वैशाली जोशी, सौ लक्ष्मी गायकवाडव शाळेतील विद्यार्थीनी मैत्री कुरकुट,मृणाल करमाळकर,नंदिनी काळे,भार्गवी पाठक,अमृता इटेकर,अस्मिता नाईक,वृंदा येवतेकरसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

टँम्पो चालकास लुटले; चालकावर तलवारीने केले वार

इमेज
  टँम्पो चालकास लुटले; चालकावर तलवारीने केले वार अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अहमदपुरकडून येणार्‍या आयशर टॅम्पो चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ टेम्पो थांबवून लघुशंकेसाठी थांबले असता शाईन गाडीवर आलेल्या तिघा जणांनी या चालकास तलवारीने वार करून जवळील एक हजार रूपये घेवून पोबारा केला. जखमी चालकाने धायगुडा पिंपळा येथील सय्यद आफरोज याला माहिती दिल्यानंतर त्याने मित्रासमावेत त्या तीन चोरट्याची दुचाकी आडवली. परंतु या तील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता घडली. एक जणाला ग्रामिण पोलिसाच्या हवाली केले असून या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अहमदपुरकडून एम.एच.44.यु.0992 हा आयशर टेम्पोवर चालक म्हणून वरवटी येथील जनार्धन उत्तम उघडे हे चालक होते. टेम्पोमध्ये लिक्वीड भरल्यामुळे गावी जात होते. पिंपळा धायगुडा येथून परळीकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुरदर्शन केंद्रा नजीक उघडे हे टेम्पो रोडलगत उभे करून लघुशंकेसाठी खाली उतरले. त्यानंतर शाईन दुचाकी गाडीवर आलेल्या तिघाजणांनी चाकु व तलवारीने वार करण्यास सुरूवात केले. संबंधीत चालकाने मारहाण करू नका विनव
इमेज
  अंबा कारखान्याच्या चेअरमनपदी दुसर्‍यांदा रमेशराव आडसकर; दत्तात्रय पाटील यांना  व्हाईस चेअरमन पद  अंबाजोगाई - मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असणारा अंबाजोगाई सहकार साखर कारखाना बिनविरोध काढून एक आदर्श निर्माण केला होता. आज चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीमध्ये चेअरमनपदी रमेश आडसकर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. तर  दत्तात्रय पाटील यांना व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली  आहे.  मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असलेला अंबाकारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली होती. या निवडणूकीवर होणारा अनाठाई खर्च वाचविण्यासाठी विरोधकांना सोबत घेत ही निवडणूक बिनविरोध काढली. शनिवार चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी कारखाना परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत चेअरमनदपदी रमेश आडसकर तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणूकीत मुंडे-बहिण भावाने एकत्र येवून कारखाना बिनविरोध काढला. याचाच धागा धरत आडसकरांनी देखील अंबाकारखाना बिनविरोध काढण्यासाठी विरोधकांना सोबत घेत हा कारखाना बिनविरोध काढला. कारखन्याच्या संचालक

केडीसीसी बँकेमध्ये कृषी अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी हा २५ वर्षांचा अनुभव

इमेज
  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड      केडीसीसी बँकेमध्ये कृषी अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी हा २५ वर्षांचा अनुभव           कोल्हापूर, दि. २९:       महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड झाली. डॉ. श्री. माने  सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापक पदी निवड होणारे डॉ. श्री. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. बँकेने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासन व बोर्ड विभागाची व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.        बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीत श्री. माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या व येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.   

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

इमेज
  खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या ! परळी वैजनाथ दि १ :- परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे वय ५४  रा.कन्हेरवाडी यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.            प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आत्माराम (बंडू) मुंडे हे काल रात्री घरातून गेले होते. आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांचा  खून झाला असल्याचे दिसून येत  आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. ही घटना का व कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने  खळबळ उडाली आहे.परळी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.घटनास्थळावर पोलीस प्रक्रिया सुरु आहे.दरम्यान संपूर्ण पोलीस प्रक्रियेनंतर या घटनेची सविस्तर माहिती पुढे येणार आहे. ----------------------------------------------------

प.पू. अनय रेवाशीष महाराज करणार कथा वाचन

इमेज
 2 जुलैपासून परळीत श्री नर्मदा पुराण कथा प.पू. अनय रेवाशीष महाराज करणार कथा वाचन परळी/ प्रतिनिधी- श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होत असून प्रसिद्ध कथा वाचक व नर्मदा पुराण कथेचे अभ्यासक प.पू. श्री अनय रेवाशीष, कैवल्याधाम आश्रम, श्रीक्षेत्र ओंकारेश्वर हे कथेचे वाचन करणार आहेत. राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व श्री नर्मदा परिक्रमा समुह महिला मंडळ परळीच्या वतीने या कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 ते 8 जुलै या कालावधीत परळी येथे श्री नर्मदा पुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगीक वसाहत येथे दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत कथेचा कार्यक्रम होणार आहे. श्री नर्मदा पुराण कथा संगीतमय असून ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध कथा वाचक प.पू. अनय रेवाशीष हे कथेचे निरुपन करणार आहेत. संगीतमय कथा वाचन असून भाविक-भक्तांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कथेचा सर्व भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व नर्मदा परिक्रम समुह महिला मंडळ, परळी वै. यांच्या वतीने करण्यात येत आहे.
इमेज
  तलाठी संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन- जिल्हाधिकारी राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरून जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख पुणे यांचेकडील पत्र क्र. तलाठी भरती/ प्र.क्र.३१/२०२३ दिनांक २५/०५/२०२३ अन्वये विभागस्तरावर व जिल्ह्यस्तरावर करण्या साठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता “जिल्हाधिकारी कार्यालय बीड" येथे खालीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे. मदत कक्ष (हेल्प डेस्क) संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. १.श्री शिवकुमा

पिंपरीच्या शाळेतील रिक्त शिक्षकांची तात्काळ पदं भरा

इमेज
  पिंपरीच्या शाळेतील रिक्त शिक्षकांची तात्काळ पदं भरा अन्यथा गटशिक्षणाधीकारी कार्यालयात शाळा भरवणार; ग्रामस्थांचा ईशारा परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसह ईतर चार शिक्षकांची पदं गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. ही रिक्त पदं न भरल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत गटशिक्षणाधीकारी कार्यालय गांभीर्यपूर्वक विचार करत नसल्यामुळे तात्काळ रिक्त पदं भरा अन्यथा गटशिक्षणाधीकारी कार्यालयातच शाळा भरवू असा ईशारा  ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. पिंपरी बु. येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन ते चार वर्षांपासून केंद्रीय प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापकांचे एक आणि शिक्षकांचे एकूण चार पदं रिक्त आहेत. अशातच काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. रिक्त शिक्षकांच्या जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीकडे दुर्लक्ष होत असून, मोठ्या प्रमाणावर शैक्षणीक नुकसान होत आहे. येत्या ०५ जुलै पर्यंत ही पदं भरावित अन्यथा सर्व ग्रामस्थ मिळव
इमेज
  “देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच मंचावर येणं ही….” पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत बीडमध्ये विनायक मेटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसणार आहेत. त्याची जोरदार चर्चा आहे. अशात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्याही चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अशात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर येत असल्याने चर्चा होते आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच मंचावर येणं ही.. आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहोत. याची चर्चा होते यात काही मोठी गोष्ट नाही. ही चर्चा होते आहे. मला तर याची कल्पनाही नाही की या गोष्टीची चर्चा होते आहे. आमच्या एकत्र येण्याचं इतकं काही महत्त्वाचं नाही. देवेंद्र फडणवीस आधी ज्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्यात आले होते त्या कार्यक्रमांना मी जाणं अपेक्षितच नव्हतं. आजच्या कार्यक्रमाला मला विनायक मेटेंच्या पत्नीने बोलवलं आहे त्यांचा मला फोन आला होता असं पंकजा मुं
इमेज
  श्रीगुरु पौर्णिमा विशेष:जाणून घ्या गुरुपौर्णिमेमागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक तथ्य गुरुदेव श्री आशुतोष महाराज (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.) शतको वर्षापूर्वी महर्षी वेद व्यास जी आषाढ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाले होते. त्यांनी वैदिक स्तोत्रे संकलित केली आणि त्यांचे चार वेदांच्या रूपात वर्गीकरण केले. १८ पुराणे, १८ उपपुराणे, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, महाभारत इत्यादी अतुलनीय ग्रंथांच्या लेखनाचे श्रेयही त्यांना जाते. व्यास जी यासाठी प्रसिद्ध आहेत - व्यासोच्छिष्ठम् जगत् सर्वम् म्हणजे असा कोणताही विषय नाही, जो महर्षी वेद व्यासजींचा माहिती नाही. अशा महान गुरुदेवांच्या ज्ञानाच्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेल्या शिष्यांना त्यांच्या गुरुदेवांची पूजा करता आली नाही. आता कोणत्या शुभ दिवशी पूजा करावी हा प्रश्न होता. असाच एक दिवस ज्यावर सर्व शिष्यांनी सहमती दर्शवली तो म्हणजे गुरुच्या आवताराचा शुभ दिवस होता. म्हणूनच त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गुरूंची पूजा करण्यासाठी हा शुभ दिवस निवडला. यामुळेच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तेव्हापासून आजपर्यंत प्रत
इमेज
हवामानाचा अंदाज करणारे पंजाबराव डख का चर्चेत आहेत? मुंबई : पंजाबराव डख... हा माणूस ना हवामानशास्त्रज्ञ आहे, ना हवामान खात्यातला तज्ज्ञ अधिकारी... पण मराठवाड्याचा हा शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच हवामानाचा अंदाज देतो. हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास त्यामागच्या विज्ञानाचा अभ्यास लागतो. पण पंजाबराव डख हवामान शास्त्रज्ञ नसतानाही अंदाज वर्तवतात. एक साधारण शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच अंदाज वर्तवत असल्यामुळे पंजाबराव डख चर्चेत आलेत. पण डख यांचे हवामानाचे अंदाज खरे ठरतात का? आणि त्यांच्यावर आक्षेप काय आहेत? कोण आहेत पंजाबराव डख? पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचे आहेत. १९९५ पासून ते टीव्हीवर हवामान अंदाज पाहायचे. पण टीव्हीवरील खोटे ठरणारे अंदाज आणि शेतीचं होणारं नुकसान यामुळे पंजाबराव डख यांनी हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं. पंजाबराव डख यांनी १९९९ ला परभणीत कॉम्प्युटरचा कोर्स केला. परभणीला जाऊन कॉम्प्युटरवर सॅटेलाइटवर उपग्रहांच्या फोटोंवरून हवामानाचा अभ्यास सुरू केला. उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणा खुणांच्या अभ्यासावरून हवामानाच्या बदलांचा अंदाज घेतला. त्यानंतर १९९९ पासू
इमेज
  पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांना फराळाचे वाटप पंढरपूर (प्रतिनिधी):-आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना तसेच भाविक भक्तांना फराळाचे व पाण्याचे करण्यात आले. मराठाभूषण, राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने दि.29 जुन 2023 रोजी पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी असते. लाखो भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. या निमित्त हजारो वारकऱ्यांना, भाविक भक्तांना पिण्याचे पाणी, साबुदाणा, फराळाचे लाडू आदींचे वाटप मराठा भूषण, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्यासह उक्कडगावचे सरपंच भाऊ मोरे

नंदागौळच्या विठ्ठल टेकडी वर हजारो भाविकांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन !

इमेज
  नंदागौळच्या विठ्ठल टेकडी वर  हजारो भाविकांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन ! विठूनामाच्या गजराने अवघी दुमदुमली विठ्ठल टेकडी ! परळी(प्रतींनिधी)परळी तालुक्यातील नंदागौळ येथील विठ्ठल टेकडी येथे सुमारे ७५० वर्षा पूर्वी महान संत जगमित्र नागा महाराज यांना साक्षात विठ्ठल पांडुरंग यांनी वाघाच्या रुपात दर्शन दिले होते,हाच वाघ गळ्यातील गमजाने धरून संत जगमित्र नागा महाराजांनी परळी वैजनाथ येथे वाघरुपी विठ्ठलाला नेले,परळीत त्या ठिकाणी सध्या मंदिर अस्तित्वात आहे,त्या काळातील या सर्व धार्मिक घटनांची नोंद संत नामदेव महाराजांच्या गाथ्या मध्ये आहे,या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकभक्त येतात,तसेच वर्षभर दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात,त्याच बरोबर श्रावण महिन्यात दरवर्षी होणाऱ्या सप्ताहास हजारो भाविक या विठ्ठल टेकडीवर येतात,या तीर्थ क्षेत्राचा विकास गावचे सरपंच सुंदर गित्ते यांनी माजीमंत्री आ.धंनजय मुंडे यांच्या माध्यमातून केला आहे,त्यामुळे या उंच टेकडीवर भाविकांना पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.आज २९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त गावचे सरपंच
इमेज
  परळीत ईद-उल-अजहा उत्साहात साजरी परळी / प्रतिनिधी  राज्यात 29 जूनला बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा साजरी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज परळी शहरातही मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत मशिदी‌ आणि शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी केली.        ईदची नमाज इदगाहवर अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाज बांधवांची ईद-उल-अज़हा म्हणजे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात.      नई ईदगाह मलकापूर येथे मुफ्ती अश्फाक खासमी  यांनी यावेळी समाजात एकता कायम राहावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात, ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असता
इमेज
Set exam result : सेट परीक्षेचा निकाल जाहीर पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेचा निकाल ६.५९ टक्के लागला असून, ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे पात्र ठरलेल्यांमध्ये दोन तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा विद्यापीठातर्फे २६ मार्चला घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १ लाख १९ हजार १८३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख १ हजार २५७ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ६ हजार ६७६ उमेदवार पात्र ठरले. पात्र ठरलेल्यांमध्ये ३ हजार ५७० पुरुष उमेदवार, तर ३ हजार १०४ महिला उमेदवार आहेत. या परीक्षेसाठी २५ तृतीयपंथी उमेदवारांनीही नोंदणी केली होती. त्यातील दोन उमेदवार पात्र ठरल्याची माहिती विद्यापीठाने दिली
इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट पंढरपूर दि. २९ (उ.मा.का.) : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन रस्ता  येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित वारकरी भाविकांना आषाढी एकादशी आणि वारीच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी वारीत आरोग्य विभागाने  वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य विषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना दीड लाखांऐवजी ५ लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यात ७००
इमेज
 'शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश वाटप पंढरपूर, दि. २९ (उ. मा. का.) - 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदि उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे.  शासनाने ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मंत्रीमंडळ बैठकीत नियमितपणे याचा आढावा घेण्यात येतो. 'शासन आपल्या दारी'&#