इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 तलाठी संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन- जिल्हाधिकारी


राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरून जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.


अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख पुणे यांचेकडील पत्र क्र. तलाठी भरती/ प्र.क्र.३१/२०२३ दिनांक २५/०५/२०२३ अन्वये विभागस्तरावर व जिल्ह्यस्तरावर करण्या साठी सूचना प्राप्त झाल्या आहेत.


या अनुषंगाने जिल्ह्यातील तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता “जिल्हाधिकारी कार्यालय बीड" येथे खालीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.


मदत कक्ष (हेल्प डेस्क) संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे.


१.श्री शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, 

भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३७७७५६५ कार्यालय फोन नंबर ०२४४२-२२२६०४


२.श्री सुरज मुळे,महसूल सहायक, 

भ्रमणध्वनी क्रमांक ९५९५४७७९७९ कार्यालय फोन नंबर ०२४४२-२२२६०४


 महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्र. तलाठी-२०२२/ प्र.क्र.१९०/ई-१० दिनांक १५ डिसेंबर 2022 अन्यये तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे सूचित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!