प.पू. अनय रेवाशीष महाराज करणार कथा वाचन

 2 जुलैपासून परळीत श्री नर्मदा पुराण कथा



प.पू. अनय रेवाशीष महाराज करणार कथा वाचन

परळी/ प्रतिनिधी-

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होत असून प्रसिद्ध कथा वाचक व नर्मदा पुराण कथेचे अभ्यासक प.पू. श्री अनय रेवाशीष, कैवल्याधाम आश्रम, श्रीक्षेत्र ओंकारेश्वर हे कथेचे वाचन करणार आहेत. राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व श्री नर्मदा परिक्रमा समुह महिला मंडळ परळीच्या वतीने या कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 2 ते 8 जुलै या कालावधीत परळी येथे श्री नर्मदा पुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगीक वसाहत येथे दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत कथेचा कार्यक्रम होणार आहे. श्री नर्मदा पुराण कथा संगीतमय असून ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध कथा वाचक प.पू. अनय रेवाशीष हे कथेचे निरुपन करणार आहेत. संगीतमय कथा वाचन असून भाविक-भक्तांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कथेचा सर्व भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व नर्मदा परिक्रम समुह महिला मंडळ, परळी वै. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार