पिंपरीच्या शाळेतील रिक्त शिक्षकांची तात्काळ पदं भरा

 पिंपरीच्या शाळेतील रिक्त शिक्षकांची तात्काळ पदं भरा

अन्यथा गटशिक्षणाधीकारी कार्यालयात शाळा भरवणार; ग्रामस्थांचा ईशारा

परळी (प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे पिंपरी बु. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसह ईतर चार शिक्षकांची पदं गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. ही रिक्त पदं न भरल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत गटशिक्षणाधीकारी कार्यालय गांभीर्यपूर्वक विचार करत नसल्यामुळे तात्काळ रिक्त पदं भरा अन्यथा गटशिक्षणाधीकारी कार्यालयातच शाळा भरवू असा ईशारा  ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

पिंपरी बु. येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन ते चार वर्षांपासून केंद्रीय प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापकांचे एक आणि शिक्षकांचे एकूण चार पदं रिक्त आहेत. अशातच काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे. रिक्त शिक्षकांच्या जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीकडे दुर्लक्ष होत असून, मोठ्या प्रमाणावर शैक्षणीक नुकसान होत आहे. येत्या ०५ जुलै पर्यंत ही पदं भरावित अन्यथा सर्व ग्रामस्थ मिळवून गटशिक्षणाधीकारी कार्यालयातच शाळा भरवू असा ईशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !