नंदागौळच्या विठ्ठल टेकडी वर हजारो भाविकांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन !

 नंदागौळच्या विठ्ठल टेकडी वर  हजारो भाविकांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन !

विठूनामाच्या गजराने अवघी दुमदुमली विठ्ठल टेकडी !


परळी(प्रतींनिधी)परळी तालुक्यातील नंदागौळ येथील विठ्ठल टेकडी येथे सुमारे ७५० वर्षा पूर्वी महान संत जगमित्र नागा महाराज यांना साक्षात विठ्ठल पांडुरंग यांनी वाघाच्या रुपात दर्शन दिले होते,हाच वाघ गळ्यातील गमजाने धरून संत जगमित्र नागा महाराजांनी परळी वैजनाथ येथे वाघरुपी विठ्ठलाला नेले,परळीत त्या ठिकाणी सध्या मंदिर अस्तित्वात आहे,त्या काळातील या सर्व धार्मिक घटनांची नोंद संत नामदेव महाराजांच्या गाथ्या मध्ये आहे,या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकभक्त येतात,तसेच वर्षभर दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात,त्याच बरोबर श्रावण महिन्यात दरवर्षी होणाऱ्या सप्ताहास हजारो भाविक या विठ्ठल टेकडीवर येतात,या तीर्थ क्षेत्राचा विकास गावचे सरपंच सुंदर गित्ते यांनी माजीमंत्री आ.धंनजय मुंडे यांच्या माध्यमातून केला आहे,त्यामुळे या उंच टेकडीवर भाविकांना पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.आज २९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त गावचे सरपंच सुंदर गित्ते व सौ.पल्लवी गित्ते या दांपत्याने सकाळी ६ वाजता  महापूजा केली. या वर्षी तर आषाढी एकादशी निमित्त या जागृत देवस्थानावर सकाळी 6 वाजल्या पासून नंदागौळसह पूस,तळणी, जवळगाव, बर्दापूर, तेलघना,अंबलटेक,परळी आदि गावसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी विठ्ठल टेकडीवर येऊन विठूनामाचा गजर करत श्री विठ्ठल - रुक्मिणी व संत जगमित्रनागा महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले,दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकभक्तांची पिण्याच्या पाण्याची व दिवसभराच्या फराळाची व्यवस्था सरपंच सुंदर गित्ते यांनी केली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !