अंबा कारखान्याच्या चेअरमनपदी दुसर्‍यांदा रमेशराव आडसकर; दत्तात्रय पाटील यांना  व्हाईस चेअरमन पद 

अंबाजोगाई - मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असणारा अंबाजोगाई सहकार साखर कारखाना बिनविरोध काढून एक आदर्श निर्माण केला होता. आज चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीमध्ये चेअरमनपदी रमेश आडसकर यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. तर  दत्तात्रय पाटील यांना व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली  आहे. 

मराठवाड्यातील सर्वात जुना व मोठे कार्यक्षेत्र असलेला अंबाकारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली होती. या निवडणूकीवर होणारा अनाठाई खर्च वाचविण्यासाठी विरोधकांना सोबत घेत ही निवडणूक बिनविरोध काढली. शनिवार चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी कारखाना परिसरात आयोजित केलेल्या बैठकीत चेअरमनदपदी रमेश आडसकर तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणूकीत मुंडे-बहिण भावाने एकत्र येवून कारखाना बिनविरोध काढला. याचाच धागा धरत आडसकरांनी देखील अंबाकारखाना बिनविरोध काढण्यासाठी विरोधकांना सोबत घेत हा कारखाना बिनविरोध काढला. कारखन्याच्या संचालक मंडळात केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, रेणापुर या तिन्ही तालुक्यातील नवख्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कारखान्याचे कार्य क्षेत्र बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यासाठी सहकार क्षेत्रात अंबाकारखाना महत्वाचा मानला जातो. अंबा कारखाना ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांच्यासाठी नेहमीच संजीवणी ठरलेला आहे. कारखाना सुरू झाला की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कार्यक्षेत्रातील इतर साखर कारखान्याप्रमाणे भाव देण्याचे काम अंबासाखरने केलेल आहे. आडसकरांनी अंबाकारखाना कर्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. हा कारखाना राजकारणाची दिशा ठरविण्यात गणला जातो. ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांचे हित लक्षात घेवून निवडणूकीवर होणारा खर्च टाळून बिनविरोधी काढला. यामध्ये सर्व नविन चेहर्‍यांना संधी उपलब्ध करून दिली. सोबतच आडसकरा यांच्या राजकारणातील एकेकाळचे कट्टर विरोधक राहिलेले दत्तात्रय पाटील यांच्याशी जुळवून घेत मैत्रीचा हात पुढे केला. आणि त्यांना व्हाईस चेअरमची संधी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !