युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

टँम्पो चालकास लुटले; चालकावर तलवारीने केले वार

 टँम्पो चालकास लुटले; चालकावर तलवारीने केले वार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अहमदपुरकडून येणार्‍या आयशर टॅम्पो चालक धायगुडा पिंपळा ते परळी रोडवरील दुरदर्शन केंद्राजवळ टेम्पो थांबवून लघुशंकेसाठी थांबले असता शाईन गाडीवर आलेल्या तिघा जणांनी या चालकास तलवारीने वार करून जवळील एक हजार रूपये घेवून पोबारा केला. जखमी चालकाने धायगुडा पिंपळा येथील सय्यद आफरोज याला माहिती दिल्यानंतर त्याने मित्रासमावेत त्या तीन चोरट्याची दुचाकी आडवली. परंतु या तील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता घडली. एक जणाला ग्रामिण पोलिसाच्या हवाली केले असून या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदपुरकडून एम.एच.44.यु.0992 हा आयशर टेम्पोवर चालक म्हणून वरवटी येथील जनार्धन उत्तम उघडे हे चालक होते. टेम्पोमध्ये लिक्वीड भरल्यामुळे गावी जात होते. पिंपळा धायगुडा येथून परळीकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुरदर्शन केंद्रा नजीक उघडे हे टेम्पो रोडलगत उभे करून लघुशंकेसाठी खाली उतरले. त्यानंतर शाईन दुचाकी गाडीवर आलेल्या तिघाजणांनी चाकु व तलवारीने वार करण्यास सुरूवात केले. संबंधीत चालकाने मारहाण करू नका विनवणी केली. तरी त्यातील एक जणाने खिशातील एक हजार रूपये व मोबाईल हिसकावून घेत चाकूने पायावर वार केले. आणि तिघेजण विनानंबरच्या शाईन गाडीवर धायगुडा पिपंळा दिशेने निघुन केले. चालक उघडेच्या मित्रामुळे यातील एक जण सापडला असला तरी अन्य दोघे जण पळून गेले आहेत. ग्रामिण पोलिसांनी या आरोपीसह त्याच्याकडील दुचाकी एक चाकु मोबाईल व एक हजार रूपये जप्त केले आहेत. त्याच्या विरोधात ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र घुगे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या