आदर्श पायंडा- अनोखा वाढदिवस

 वाचनालय सुरु करुन सोपान ताटे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा


    परळी (प्रतिनिधी)

    बुद्ध फुले आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असणारे भिमनगर येथील सोपान ताटे यांचा वाढदिवस आज 1 जुलै रोजी प्रस्थापित पद्धतीला नाकारून कसलाही ताम धाम न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन करून संपन्न करण्यात आला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सोपान ताटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

      भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कॉम्रेड पी. एस. घाडगे सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, भिमनगर वंदना संघाचे संचालक प्रा.विलास रोडे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते भारत ताटे, माजी नगरसेवक नितीन रोडे, काँग्रेस नेते गणपत आप्पा कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

     यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास युवक नेते भारत ताटे यांनी 5000 रुपयाची देणगी जाहीर केली.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रस्ताविक ॲड.संजय रोडे यांनी केले तर आभार डॉ. सिद्धार्थ जगतकर यांनी मांडले.

     या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर, नवनाथ क्षीरसागर यांचे सह विलास आदोडे, उत्तम समुद्रे, संतोष आदोडे, मुकुंद ताटे, संघपाल आदोडे, दीपक शिरसाट, राघू ताटे, एस.के.ताटे, प्रेम जगतकर, वसंत बनसोडे, प्रसन्नजीत ताटे, अमर ताटे, शैलेश ताटे, चेतन ताटे, शुभम किवंडे, अविनाश उजगरे, आनंद ताटे, स्वराज आदोडे, आदित्य ताटे, सिद्धोधन ताटे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार