परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 'शासन आपल्या दारी'अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश वाटप


पंढरपूर, दि. २९ (उ. मा. का.) - 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक लाभाचे वितरण करण्यात आले आहे.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आदि उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती व लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन चांगल्या प्रकारे करत आहे.  शासनाने ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मंत्रीमंडळ बैठकीत नियमितपणे याचा आढावा घेण्यात येतो. 'शासन आपल्या दारी'' योजनेच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध दाखले देण्याचे काम होत आहे. योजना सामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखलेही एकाच छताखाली मिळतात. सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे. या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्व सामान्य जनतेचे आहे. सामान्य माणसाचे आरोग्य जपणारे आहे. वारी कालावधीत 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १८  जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.


एक जानेवारी २०२३ पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट ड संवर्गातील एकूण ५९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन अनुकंपा तत्त्वावरील उपलब्ध रिक्त जागांवर या नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, वृषाली केसकर, अजिंक्य गोडगे, परिविक्षाधीन नायब तहसिलदार तुषार शिंदे यांनी काम पाहिले. 

18 जणांना नियुक्तीपत्रे वाटप

तलाठी पदासाठी आठ उमेदवारांची अनुकंपा तत्त्वावर तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग येथील कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर दोन शिपाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवर पाच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व तीन शिपायांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!