युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 परळीत ईद-उल-अजहा उत्साहात साजरी


परळी / प्रतिनिधी 

राज्यात 29 जूनला बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा साजरी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज परळी शहरातही मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत मशिदी‌ आणि शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी केली.

       ईदची नमाज इदगाहवर अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाज बांधवांची ईद-उल-अज़हा म्हणजे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात.

     नई ईदगाह मलकापूर येथे मुफ्ती अश्फाक खासमी  यांनी यावेळी समाजात एकता कायम राहावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे.

रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात, ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात. पाच सणाला ईद-उल-अजहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे

     मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-अजहाला विशेष महत्त्व समजले जाते. या दिवशी रमजान ईद प्रमाणे सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करतात.परळीत उत्साहात ईद साजरी झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या