वेगाने राजकीय घडामोडी: अजितदादा राजभवनात




बीड : राज्यात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या असून आजच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात असून बीड जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार उपस्थित असून 'बैठक संपल्यावर अजित पवार राजभवनात जाणार असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येणार असून मागच्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते मात्र यावेळी बीड तील एक नेता मंत्री म्हणून शपथ घेणे मानले जात आहे. त्यामुळे आता नजरा मुंबईकडे लागल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!