दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने  सोमवारी परळीत गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने उद्या सोमवार दि.3 जुलै रोजी गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी संस्थानच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

येथील हालगे गार्डन, परळी वै. मध्ये असलेल्या प्रशस्त भव्य प्रांगणात सोमवारी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनानुसार हा उत्सव साजरा केला जाणार असून सकाळी 9 वा. गुरू पुजन व त्यानंतर धार्मीक कार्यक्रमांना प्रारंभ केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सत्संग, किर्तन, प्रवचन व भजनाचाही कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने या धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मीक सोहळयाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !