कंत्राटदार बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल

 कंत्राटदार बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     कन्हेरवाडी येथील कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे हत्येप्रकरणी दोन संशयितांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत परळी शहर पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, 30/06/2023 रोजीचे सायंकाळी 18.30 ते दि.01/07/2023 रोजीचे दुपारी 14.00 वाजण्याचे दरम्यान जिरेवाडी बायपास चे प्लॉटवरील पत्र्याचे शेडमध्ये मयत आत्माराम उर्फ बंडू मुंडे हे असताना त्यांचे डोक्यात लोखंडी सी चॅनल मारुन गंभीर दुखापत करून जिवे ठार मारले. याबाबत फिर्यादी शिवाजी निवृत्ती मुंडे वय 50 वर्ष व्यवसाय शेती रा. कन्हेरवाडी यांनी फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीत नमुद प्राथमिक संशयावरुन वॉचमन व अन्य एक अशा दोन संशयीतांविरुद्ध गुरनं. 128/2023 कलम 302,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले,परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  सपोनी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनी सपकाळ, किशोर घटमल,पांचाळ हे करत आहेत. 
----------------------------------------------------




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !