इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

केडीसीसी बँकेमध्ये कृषी अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी हा २५ वर्षांचा अनुभव

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड

    

केडीसीसी बँकेमध्ये कृषी अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी हा २५ वर्षांचा अनुभव

         

कोल्हापूर, दि. २९:

      महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड झाली. डॉ. श्री. माने  सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापक पदी निवड होणारे डॉ. श्री. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. बँकेने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासन व बोर्ड विभागाची व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.

      

बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीत श्री. माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या व येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.

  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या