पोस्ट्स

शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री

इमेज
● कृषी प्रश्नावर किसान सभा व कृषी मंत्री यांच्यात सखोल चर्चा शेतकऱ्यांप्रति शासन संवेदनशील - कृषिमंत्री परळी / प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना तातडीने दिलासा देण्यासंदर्भात किसान सभेच्या शिष्ट मंडळाने राज्याचे कृषी मंत्री यांची भेट घेत विविध मागण्यांसाठी सखोल चर्चा केली यावेळी कृषिमंत्री यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासित केले. अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आपणास निवेदन करण्यात येते की, सन 2020 च्या पिक विमा पासून ते मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापर्यंत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यात भर म्हणून की काय यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पुरता हातचा गेलेला आहे तर रब्बी हंगाम सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती लागेल याची सूतराम शक्यता नाही. पावसा अभावी जिल्ह्यातील पीक परिस्थितीच नाही तर एकंदर पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंत सर्वच स्थिती बिकट आहे. उत्तरोत्तर परिस्थिती आणखी दाहक होत जाणार आहे. म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा स्थित

राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम

इमेज
व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्राची कोअर टीम जाहीर ! परळीला बहुमान: सुकेशनी नाईकवाडे यांचा समावेश राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात आघाडीची पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या महाराष्ट्रातील कोअर टीमची घोषणा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केली आहे. या टीममध्ये राज्यातील सर्वच विभागांमधील नामवंत पत्रकारांचा समावेश केला आहे. ही टीम राज्यात अनेक उपक्रम, कृतिशील कार्यक्रम आणि संघटनेतील एकूण रूपरेषा ठरवण्यासाठी कार्यरत असणार आहे. या कोअर टीमचे प्रमुख अनिल म्हस्के आणि बालाजी मारगुडे असतील. त्यांनी घोषित केलेले उर्वरित लीड करणारे मुख्य पदाधिकारी, प्रमुख याप्रमाणे असतील. मुंबईमधून विलास बर्ड, फराह खान, शैलेजा जोगल, सुरेश उमके हे असतील. पुणे विभागातून राजश्री आगाम, ज्ञानेश्वर चौतमल जयपाल गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड येथून प्रवीण कोळआपटे, ठाणे येथून अरुण ठोंबरे, सचिन मोहिते (सांगली), यांचा समावेश आहे. आजीत कुंकूलोळ (सोलापूर) यांच्या नावांची घोषणा केली आहे. मराठवाडयातून विजय चोरडिया (औरं

परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम

इमेज
  स्मशानभूमीत झाड लावून आणि नाश्ता करून रात्री साजरा करण्यात आला वाढदिवस परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम परळी / प्रतिनिधी   माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचे भूत प्रेतामध्ये रूपांतर होते, स्मशानभूमीत रात्री जाणे धोक्याचे असते अशा प्रकारच्या अंधश्रद्धा संपवण्यासाठी चक्क स्मशानभूमीतच रात्री वडाचे झाड लावून आणि सामुदायिक नाश्ता करून परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा अनोखा क्रांतिकारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे विशेष उपस्थिती होती. या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.    परळी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा वाढदिवस काल रात्री 10  वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे वैशिष्ट म्हणजे रात्री घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजात वैज्ञानिक जनजागृती निर्माण व्हावी, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, प्रेतात्मा, भूत प्रेत याबद्दलची भीती नष्ट व्हावी, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह नष्ट होतो हा संदेश देण्यासाठी

धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन

इमेज
  देशसेवेत प्राणार्पण केलेले शहीद जवान पांडुरंग तावरे अमर झाले - धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन बीड (दि.09) - देशसेवेत कर्तव्यावर असताना अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत प्राणार्पण केलेले शहीद जवान स्व.पांडुरंग तावरे अमर झाले आहेत. त्यांचे बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल, असे वक्तव्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  सिक्कीम येथे देशसेवेत कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद स्व.पांडुरंग तावरे यांच्या कुटुंबियांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज काकडहिरा येथे भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या सुपुत्राने आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचावेत यादृष्टीने मदत करताना आपले प्राणार्पण केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी स्व.पांडुरंग अमर असल्याची भावना व्यक्त केली.  सोमवारी सकाळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांसमवेत बीड जिल्ह्यातील विविध विषयी महत्वाची बैठक आयोजित असल्याने रविवारी रात्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काकडहिरा येथे भेट देऊन तावरे कुटुंबियांचे सांत्वन केले. आपण तावरे कुटुंबाच्या दुःखात स

कार्याचा गौरव.........

इमेज
  रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन: बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने गौरव परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन केल्याबद्दल व या उदात्त कार्याचे ऋणनिर्देश व्यक्त करत बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला आहे.              डाॅ.भालचंद्र रक्तपेढी,लातूर द्वारा "रक्तदान शिबीर आयोजक" यांचा कृतज्ञता सोहळा  लातूर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने ॲड.प्रताप धर्माधिकारी यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला.गेल्या १५ वर्षांपासून बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने परळीत  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.या शिबिरात दरवर्षीच विक्रमी संख्येत  रक्तदान होते. अनेक रुग्णांना यामाध्यमातून जीवनदान प्राप्त झालेले आहे. या आयोजनाबद्दल हा गौरव करण्यात आला.               या कार्यक्रमास पद्मभूषण डाॅ.अशोक कुकडे काका (संस्थापक व

सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !

इमेज
  आगळंवेगळं: अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका: सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे ! परळी वैजनाथ(प्रतिनिधी):- सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असुन विविध माध्यमातून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होत आहे.       सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा ऐतिहासिक होणार असुन इतिहासात नोंद होणा-या या सभेचे साक्षीदार होऊन या सभेस सहकुटुंब हजेरी लावावी असे आवाहन गावागावांत विविध माध्यमातून केले जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागिल अनेक वर्षांपासून समाज बांधव विविध मार्गाने अंदोलने संपूर्ण राज्यात करत आहे. आता कुठेतरी मनोज जरांगे यांनी राज्य सरकाराला धारेवर धरत आपल्या अंदोलनाचा लढा सराटी अंतरवाली या गावातून सुरु केला आहे. या

सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

इमेज
  सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा कर्तव्यावर असलेले जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. यामध्ये ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिस्ता नदीला मोठा पूर: सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला. Click - ● *आगळंवेगळं:*■ *_अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका_* _सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप ; भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांचा उपक्रम

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप ; भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांचा उपक्रम  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांनी आयोजित केले होते.        भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनखाली भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांच्या वतीने शनिवार दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी १२.१५ वाजता विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी  भाजयुमो जिल्हाअध्यक्ष नीळकंठ चाटे, डॉ. यशवंत देशमुख,माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे, महादेव इटके, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख, इंडिया सिमेंटचे राजसिंह शेखावत, कुलदीप खोब्रागडे यांच्यासह प्राचार्या डॉ विद्या देशपांडे,  डॉ .विनोद जगतकर,  सोमनाथ कांदे, पत्रका

सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या - धनंजय मुंडे

इमेज
  नो फॅलिटिशेशन ओन्ली ॲक्शन : सत्कार नको, कामे सांगा : पालकमंत्री धनंजय मुंडे अ‍ॅक्शन मोडवर ! पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात येताच स्वागत नाकारून धनंजय मुंडे यांनी साधला आष्टी ते बीड विविध गावातील नागरिकांशी संवाद हार तुरे नको, निवेदने द्या - धनंजय मुंडे बीड (दि.07) - हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारीत बिडकडे प्रवास केला. नेहमी हार, तुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनाच्या थप्पीने भरलेली दिसत होती! धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हा वासीयांना खरी प्रतीक्षा होती ती मुंडे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीची!  दोन दिवसंपूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते अहमदनगर येथील 'शब्दगंध' या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, आष्टी तालुक्याच्या हद्दी पासून जागोजाग गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतास

वडखेल येथील ग्रामस्थांची स्मशानभुमी व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

इमेज
  वडखेल येथील ग्रामस्थांची स्मशानभुमी व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी परळी / प्रतिनिधी      परळी तालुक्यातील वडखेल येथील स्मशानभुमीवर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शिवाय स्मशानभुमीवर जाणारा रस्ता अडविला आहे. वडखेल येथील गट क्रमांक ६५ मध्ये स्मशानभुमी आहे. चार आर (गुंठे) जमीन वडखेल येथील स्मशानभुमी साठी आरक्षीत आहे. स्मशाभुमी च्या जागेवर आत्तापर्यंत दोन वेळेस वृक्षारोपण करण्यात आले. परंतु दोन्ही वेळेस लावलेली झाडे लगतच्या शेतकऱ्यांनी काढुन टाकले आहेत. त्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे स्मशानभुमी चे बांधकाम करता आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात देखील उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावकऱ्यांवर येते. शिवाय नदी पासुन गावा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत वडखेल येथील ग्रामस्थांनी परळी तहसीलदार यांना बुधवारी (ता.६) निवेदन देऊन रस्ता व स्मशानभुमी वरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. निवेदनावर वडखेल येथील विनायक देवकते, दत्ता देवकते, रमेश देवकते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदणाच्या प्रती ग्रामसेवक वडखेल, गटविकास अधिकारी पंचायत समिती परळी, उ

बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र मिळण्यातील अडसर दूर

इमेज
  बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश  - प्रा. खाडे.बी.जी परळी वैजनाथ:- बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी ग्रामसेवकांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र  देण्याच्या सुचना द्या या मागणीसाठी बीड जिल्हा परिषदेवर 9 आगस्ट 2023 रोजी मोर्चा काढला होता. बीड जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेकांना तसे पत्र काढले व बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांना एक प्रत पाठवली.बीड जिल्यातील सर्व तालुक्यातील ग्रामसेवकाना पत्राद्वारे सुचना मिळाल्यामुळे बीड जिल्हयातील ग्रामीण भागातील बांधकाम कामगार मंडळाकडे नांव नोंदणी करून लाभ मिळवू शकतात.             महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नाव नोंदणीसाठी मागील वर्षात 90  दिवस काम केलयाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी द्यावीत असे लेखी परिपत्रक गटविकास अधिकारी (सर्व पंचायत समिती) यांना काढूनही ग्रामसेवक बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देत नव्हते. याबाबत  बीड जिल्हा बांधकामगार संघटनेच्या  वतीने आंदोलन व सातत्यपूर्ण  पाठपुरावा केला.       बांधकाम मजू

11 ऑक्टोबर रोजी प.बंगालमधिल सिलीगुडी येथे होणार सन्मान सोहळा

इमेज
  सन्मान:बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड 11 ऑक्टोबर  रोजी प.बंगालमधिल सिलीगुडी येथे होणार सन्मान सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात सातत्याने सामाजिक अभिसरण व सामाजिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अग्रेसर राहत कार्यरत असलेले व सामाजिक  समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम व योगदान देणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना राष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण समजला जाणारा यंदाचाभारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड  2023 नुकताच जाहीर झाला आहे. परळीकरांसाठी ही गौरवाची बाब असून 11 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सन्मान सोहळा होणार आहे.             भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकरांचा, 11 ऑक्टोबर 1916 रोजी "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" येथे एमएससी (अर्थशास्त्र आणि राजकीय विज्ञान) प्रवेश झाला होता.या प्रवेश दिनाच्या आठवणीत सिलीगुडी प.बंगाल येथे 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3.00 ते संध्याकाळी 6:30 राष्ट्रीय/

खालापुरीत जुगार अड्ड्यावर धाड, 12 जुगाऱ्या यासह 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

इमेज
 जुगार अड्ड्यावर धाड, 12 जुगाऱ्या यासह 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत शिरूर..... पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिरूर तालुक्यातील खालापूरी येथे एसपीच्या पथकाकडून जुगार अड्ड्यावर छापा टाकला यामध्ये 12 जुगारी व 4 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेविरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथका मार्फत सपोनी गणेश मुंडे यांच्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार दि.5 ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला यावेळी घटना स्थळावर 12 जुगारी,7 मोटारसायकल व रोख 25 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली.या धाडीत 4 लाख 25 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथका मार्फत छाप्याची माहिती शिरूर पोलीसांना कळविल्या नंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले होते.

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

इमेज
कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू अंबाजोगाई - सध्या नऊरात्राची लगबग सुरू असून पक्ष पंधरवाड्यामध्ये घरातील कपडे धुण्याचा महिलांचा सपाटा सुरू आहे. यातच दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले असता बारा वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबासाखर ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील साठवण तलावात दररम्याण मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.  अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील नवीन प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लगत असलेल्या तलवामध्ये अंबा कारखाना परिसरातील दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले असता बारा वर्षीय अश्‍विनी लहु जाधव ही मुलगी बुडू लागल्यामुळे वीस वर्षीय रोहित परमेश्‍वर चव्हाण या तरूणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्याच्या नादात त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. या घटनेची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांना कळाल्यानंतर अंबासाखर परिसरातील कार्यकर्त्यांना फोन करून व अंबाजोगाईतील कार्यकर्त्यांना घटनास्थळावर

फटाके फोडून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

इमेज
  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होताच परळीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष फटाके फोडून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव परळी वैद्यनाथ (दि. 04) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, धनंजय मुंडे यांच्या विकासकार्याचा व निर्णयांचा धडाका व कामाचा उरक पुन्हा एकदा जिल्हा वासीयांना अनुभवायला मिळणार आहे.  दरम्यान धनंजय मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती घोषित होताच परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे एकत्रित येऊन जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.  ना.धनंजय मुंडे हे कार्यतत्पर नेते आहेत. लोकांची कामे करणारे विकसनशील नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाचा झंझावात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांनी व्यक्त

पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळावी - धनंजय मुंडे

इमेज
  पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळावी - धनंजय मुंडे मुंबई, दि. ४ : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विमा कंपन्यांना दिले. वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त आहे. त्याला दिलास देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांनी देखील याकाळात नुकसानग्रस्त शेतकऱ्य
इमेज
  पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळताच धनंजय मुंडेंचा कामांचा धडाका बीड येथील प्रशासकीय इमारत व संत भगवानबाबा योजनेतील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी मिळून सुमारे 41 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मुंबई (दि. 04) - कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची आजच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंच्या कामांचा धडाका आज पाहायला मिळाला आहे.  बीड येथील मुख्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30 कोटी 95 लाख तर सामाजिक न्याय विभागांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड येथे मुलांचे वसतिगृह उभारण्यास 9 कोटी 99 लाख रुपये इतक्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती. तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेचे जनकच धनंजय मुंडे हे आहेत.  दरम्यान परळी येथील कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन केंद्र त्यापा

युवकांनो आत्महत्या करु नका,आरक्षणाची लढाई तुमच्यासाठीच आहे -मनोज जरांगे पाटील

इमेज
  युवकांनो आत्महत्या करु नका,आरक्षणाची लढाई तुमच्यासाठीच आहे -मनोज जरांगे पाटील परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)      तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या वतीने १५ सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी व गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील मंगळवारी (ता.०३) गाढे पिंपळगाव येथे आले होते. मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांचे ढोलताशांच्या गजरात, जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले.      यावेळी गाढे पिंपळगावच्या गावकऱ्यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी  करण्यात आली होती. जरांगे पाटील यांचे आगमन होताच ढोलताशांच्या गजरात चार जेसीबीच्या साह्याने फुले टाकून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच स्वागतासाठी गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा भगवे ध्वज, स्वागत कमानी गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा युवकांनी शांततेत आंदोलन करावे, कायदा हातात घेवू नका, हताश होऊन आत्महत्या करु नका तुमच्यासाठीच आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि तुम्ही आत्महत्या केल्यातर आरक

ज्ञानोबा सुरवसे यांचा प्रासंगिक विशेष ब्लॉग:जिएसटीच्या मागचा शिखंडी कोण...?

इमेज
जिएसटीच्या मागचा शिखंडी कोण...? वैद्यनाथ वाचवण्यासाठी वर्गणीची चळवळ       एखादा योध्दा शरण येत नसेल तर त्याला बदनाम केले जाते किंवा एखाद्याला संपवण्यासाठी षडयंत्र रचले जाते हा इतिहास आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वाट्टेल ते करण्याचे किंवा कोणतीही पातळी गाठण्याचे आजही प्रकार सुरू आहेत. पण अशा प्रकारालाही पुरून उरणारा किंवा षडयंत्रांवर मात करून उभे राहणारे असतेच. अनेक क्लृप्ती करूनही जो हरत नाही... डरत नाही... किंवा डगमगतही नाही असे एक व्यक्तीमत्व आहे आणि ते म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजाताई मुंडे... खरं तर त्यांना नामोहरम करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. पण जनता - जनार्दनाचा मोठा आधार, आशिर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने एकाही प्रयत्नाला यश आले नाही. सत्तेत असतानाही त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक अकांडतांडव माजविण्याचा प्रयत्न केला. अखेर निष्पन्न काही झाले नाही आणि खुद्द न्यायालयानेच क्लीन चिट दिली. त्यामुळे आरोप करणारे आणि कर

सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव

इमेज
  सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव परळी/प्रतिनिधी शिवाजीराव वाकडे पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लोहा यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील सागर संजय कुकडे यांना नांदेड येथे सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी एका  शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. परळी येथील शिवसेनेचे नेते संजय कुकडे व माजी नगरसेविका सौ.अनिता कुकडे यांचा मुलगा सागर कुकडे याला क्रीडा क्षेत्रात सातत्यपुर्ण योगदान दिल्याबद्दल सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती

इमेज
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी   परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)            लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख,प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ देशपांडे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आजच्या काळातही गरज आहे. तर मुर्ती लहान पण किर्ती महान असलेले खंबीर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या देशाला लाभले हे आमचे भाग्य असल्याचे प्राचार्या डॉ देशपांडे म्हणाल्या. तर महात्मा गांधी यांचे अनमोल विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. जय जवान जय किसान चा नारा लालबहादूर शास्त्री यांनी सर्वप्रथम दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. यल

दसरा मेळाव्यात पंकजाताईंकडे करणार सुपूर्द

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मदतीसाठी कासेवाडीकरांनी  जमवली सात लाखांची लोकवर्गणी   दसरा मेळाव्यात पंकजाताईंकडे करणार सुपूर्द   आष्टी, दि. 2 :-  स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. ज्या पक्षात पंकजाताई मुंडे आहेत त्याच पक्षाचे राज्यात केंद्रात सरकार आहे. असे असतांना  सरकारने आर्थिक अडचणीत वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत केली नाही. राज्यातील इतर साखर कारखान्यांना मदत केली ऐवढेच नाही तर जिएसटी थकवल्या प्रकरणी वैद्यनाथ कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केली व कारखान्याचा किंमती वस्तु जप्त केल्या. कारखान्याला आर्थिक मदत म्हणुन दि. 2 ऑक्टोबर रोजी कासेवाडी ता. आष्टी जि. बीड येथिल उस तोड कामगारांनी एकञ येत 7 लाख 20 हजार रूपयांची वर्गणी गोळा केली असुन ही वर्गणी सावरगावघाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.       विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप पक्षाने पंकजाताई मुंडे यांना अनेक वेळा डावलले असुन त्यांना राज्यात विधान परिषदे किंवा इतर मोठ्या पदावर घेतले नाही. पराभूत झालेल्या अनेकां

जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन

इमेज
  जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन  अंबाजोगाई, प्रतिनिधी....       अंबाजोगाई व परिसरातील जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने जुनाजाणता वारकरी भजनानंदी गुणवान हरवला आहे.      दिंगबरराव पोहरेगावकर हे  वारकरी संप्रदायातील एक  गुणवान व्यक्तीमत्व म्हणून सर्वपरिचीत होते.कै. दिगंबर गुरुजी  यांचे चिरंजीव असलेले रविंद्रगुरुजी हे गायन पखवाज तबला संवादिनी या प्रत्येक क्षेत्रातील  जुन्या काळातील जाणकार कलाकार अत्यंत मृदु स्वभाव वारकरी संप्रदायाबद्दल निष्ठा आपले संपूर्ण जीवन भजन किर्तन सत्संगात घातले असे रविंद्रगुरुजी पोहरेगावकर यांचे दि. 1/10/2023 रविवार दुपारी 3.30 वा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पोहरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.          या भजनानंदी व  हरहुन्नरी शास्त्रीय संगीतातील मर्मज्ञ वारकरी गुरुजींना सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने पोह

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक:अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक:अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ शिवसेनेचे बीड जिल्हाउपप्रमुख, परळीतील एक भगवे वादळ म्हणून सर्वपरिचीत असणारा व युवकांचे आशास्थान अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. एक दिलदार मित्र, चतुर राजकारणी व हाकेला प्रतिसाद देणारा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक अशी त्यांची ओळख असणारा सच्चा शिवसैनिक अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर.  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. ठक्कर यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम सुरू केले आणि पाहता पाहता त्यांचे कार्य व मित्र परिवार वाढत गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठक्कर यांची मोठी श्रद्धा आहे. किंबहूना शिवसेनेचा एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या चौफेर कार्याचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत. शिवसेनेचा बाणा, बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारधारेचे नैसर्गिक वर्तन असणारा शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत पक्षहिताचाच विचार करणारा असतो. पद, प्रतिष्ठा यामागे न लागता शिवसैनिक’ हे महत्त्वपूर्ण पद असल

कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

इमेज
  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा          महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ.  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात आला.                                            या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र पुराणिक व अध्यक्ष श्री सावता राम राऊत  हे लाभले.यावेळी  सर्व ज्येष्ठ नागरिकांचे  गुलाब पुष्प देऊन केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती बडवे मॅडम यांनी केले, यावेळी  केंद्राचे उपक्रम व माहिती सर्व ज्येष्ठ नागरीक यांना देण्यात आली व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमात श्री उद्धव आघाव साहेब श्री पुराणिक सर श्री तेलंग सर यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्राचे ग्रंथपाल श्री गंगाधर कांबळे यांनी बाप या विषयी सुंदर कविता सादर करून उस्थितांची मन जिंकली,कार्यक्रमाचे आभार वंदना लोखंडे यांनी केले . यासाठी केंद्र संचालक श्री विजय वायाल व कामगार कल्याण अधिकारी श्री प्रसाद धस सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व