धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन

 देशसेवेत प्राणार्पण केलेले शहीद जवान पांडुरंग तावरे अमर झाले - धनंजय मुंडे




धनंजय मुंडेंनी काकडहिरा येथे जाऊन तावरे कुटुंबियांचे केले सांत्वन


बीड (दि.09) - देशसेवेत कर्तव्यावर असताना अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत प्राणार्पण केलेले शहीद जवान स्व.पांडुरंग तावरे अमर झाले आहेत. त्यांचे बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल, असे वक्तव्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


सिक्कीम येथे देशसेवेत कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद स्व.पांडुरंग तावरे यांच्या कुटुंबियांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज काकडहिरा येथे भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या सुपुत्राने आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचावेत यादृष्टीने मदत करताना आपले प्राणार्पण केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी स्व.पांडुरंग अमर असल्याची भावना व्यक्त केली. 


सोमवारी सकाळी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांसमवेत बीड जिल्ह्यातील विविध विषयी महत्वाची बैठक आयोजित असल्याने रविवारी रात्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काकडहिरा येथे भेट देऊन तावरे कुटुंबियांचे सांत्वन केले. आपण तावरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्व.पांडुरंग तावरे यांना श्रद्धांजली वाहिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार