इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम

व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्राची कोअर टीम जाहीर !


परळीला बहुमान: सुकेशनी नाईकवाडे यांचा समावेश

राज्यातील नामवंत पत्रकारांचा समावेश, पत्रकारांच्या हितासाठी घेणार अनेक उपक्रम


मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात आघाडीची पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या महाराष्ट्रातील कोअर टीमची घोषणा प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केली आहे. या टीममध्ये राज्यातील सर्वच विभागांमधील नामवंत पत्रकारांचा समावेश केला आहे. ही टीम राज्यात अनेक उपक्रम, कृतिशील कार्यक्रम आणि संघटनेतील एकूण रूपरेषा ठरवण्यासाठी कार्यरत असणार आहे.

या कोअर टीमचे प्रमुख अनिल म्हस्के आणि बालाजी मारगुडे असतील. त्यांनी घोषित केलेले उर्वरित लीड करणारे मुख्य पदाधिकारी, प्रमुख याप्रमाणे असतील. मुंबईमधून विलास बर्ड, फराह खान, शैलेजा जोगल, सुरेश उमके हे असतील. पुणे विभागातून राजश्री आगाम, ज्ञानेश्वर चौतमल जयपाल गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड येथून प्रवीण कोळआपटे, ठाणे येथून अरुण ठोंबरे, सचिन मोहिते (सांगली), यांचा समावेश आहे.

आजीत कुंकूलोळ (सोलापूर) यांच्या नावांची घोषणा केली आहे. मराठवाडयातून विजय चोरडिया (औरंगाबाद) चेतन कात्रे (उस्मानाबाद) गजानन देशमुख (परभणी), हंकार बनसोडे (उस्मानाबाद), सुकेशनी नाईकवाडे (बीड ) विदर्भातून आनंद आंबेकर (नागपूर), मंगेश खाटीक गडचिरोली), संजय पडोळे, (चंद्रपूर), अरुण जैन (बुलडाणा), संजय राठोड (यवतमाळ), इरफान सय्यद (वाशीम), विनोद बोरे (अकोला) यांची निवड करण्यात आली आहे. तर खानदेशमधून सुरेश उज्जैनवाल (जळगाव) व भूषण अहिरे (धुळे) यांना कोअर टीममध्ये संधी देण्यात आली आहे. राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आजवर पत्रकारांचा विमा, आरोग्य समस्या, गृह योजना, पत्रकारासाठी स्वतंत्र महामंडळासाठी पाठपुरावा, तालुकास्तरावर पत्रकार भवनासाठी पुढाकार, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन हातभार लावणे.

यासह विविध आघाड्यावर संघटनेने मदतीची भूमिका ठेवली आहे. संघटनेच्या कार्याच्या जोरावरच देशभरात आज सदतीस हजारांवर सदस्य पत्रकार संघटनेशी जोडले गेल आहेत. आगामी काळात संघटनेचे नियोजन, पत्रकारांच्या समस्या कशा सोडवता येतील, यासाठी विचारविनिमय होणार आहे. थेट कृतिशील कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी कोअर टीमवर राहणार आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मुख्य कार्यवाहक बालाजी मारगुडे यांनी या संपूर्ण कोअर टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!