इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन

 जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन 


अंबाजोगाई, प्रतिनिधी....

      अंबाजोगाई व परिसरातील जुन्या पिढीतील वारकरी संगीतप्रेमी रविंद्रगुरूजी पोहरेगावकर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने जुनाजाणता वारकरी भजनानंदी गुणवान हरवला आहे.

     दिंगबरराव पोहरेगावकर हे  वारकरी संप्रदायातील एक  गुणवान व्यक्तीमत्व म्हणून सर्वपरिचीत होते.कै. दिगंबर गुरुजी  यांचे चिरंजीव असलेले रविंद्रगुरुजी हे गायन पखवाज तबला संवादिनी या प्रत्येक क्षेत्रातील  जुन्या काळातील जाणकार कलाकार अत्यंत मृदु स्वभाव वारकरी संप्रदायाबद्दल निष्ठा आपले संपूर्ण जीवन भजन किर्तन सत्संगात घातले असे रविंद्रगुरुजी पोहरेगावकर यांचे दि. 1/10/2023 रविवार दुपारी 3.30 वा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पोहरेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

         या भजनानंदी व  हरहुन्नरी शास्त्रीय संगीतातील मर्मज्ञ वारकरी गुरुजींना सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने पोहरेगावकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

---------------------------------------------------


Click-■ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक: अभयकुमार ठक्कर- परळीतील भगवे वादळ

Click-■ कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

Click-आपले धन्यवाद!!! आपल्या सहकार्याने ही वाटचाल सुरु आहे. आपण Subscribe केलचं असेल अद्याप केलं नसेल तर आत्ता नक्की करा.आपल्या मित्रपरिवारालाही Subscribe करायला लावा.










Click-■ सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या