इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा

 सिक्कीम येथे झालेल्या ढगफुटीत बीडचे जवान पांडुरंग वामन तावरे हुतात्मा


कर्तव्यावर असलेले जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. यामध्ये ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तिस्ता नदीला मोठा पूर:सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला.





आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सेवा: पांडुरंग वामन तावरे हे 2009 मध्ये लष्करात भरती झालेले होते. मागील 14 वर्षांपासून ते महार बटालियन (18) मध्ये नायक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी देशातील दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब विविध ठिकाणी देशाची सेवा केली. मागील 2 महिन्यांपूर्वी सिक्कीम मधील गंगटोक येथे कर्तव्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मंगळवारी रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिटकडं निघाले होते.

काय घडले त्या रात्री: पांडुरंग वामन तावरे हे स्वतः एका वाहनाचे चालक होते. दरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री 9.30 वाजता त्यांच्या पत्नी गोदावरी यांना मोबाईल वर संपर्क साधला आणि चर्चा केली. बुधवारी 1.30 ते 2.00 च्या सुमारास सिक्कीम येथील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. त्यात जवान वाहून गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. दोन दिवसांपासून जवानांचे प्रमुख सुभेदार मेजर यांच्या समवेत संपर्क होत आहे. परंतु, ज्याठिकाणी लष्कर छावणी होती, त्या ठिकाणी संपर्क होत नसल्याच्या सूचना बंगाल बॅंकडुगी युनिट येथून मिळाली असल्याचं जवान पांडुरंग तावरे यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सांगितलयं.

-----------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!