इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव

 सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव



परळी/प्रतिनिधी

शिवाजीराव वाकडे पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लोहा यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील सागर संजय कुकडे यांना नांदेड येथे सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी एका  शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.

परळी येथील शिवसेनेचे नेते संजय कुकडे व माजी नगरसेविका सौ.अनिता कुकडे यांचा मुलगा सागर कुकडे याला क्रीडा क्षेत्रात सातत्यपुर्ण योगदान दिल्याबद्दल सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या