बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र मिळण्यातील अडसर दूर

 बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश  - प्रा. खाडे.बी.जी

परळी वैजनाथ:- बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी ग्रामसेवकांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र  देण्याच्या सुचना द्या या मागणीसाठी बीड जिल्हा परिषदेवर 9 आगस्ट 2023 रोजी मोर्चा काढला होता. बीड जि.प मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेकांना तसे पत्र काढले व बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांना एक प्रत पाठवली.बीड जिल्यातील सर्व तालुक्यातील ग्रामसेवकाना पत्राद्वारे सुचना मिळाल्यामुळे बीड जिल्हयातील ग्रामीण भागातील बांधकाम कामगार मंडळाकडे नांव नोंदणी करून लाभ मिळवू शकतात.

            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नाव नोंदणीसाठी मागील वर्षात 90  दिवस काम केलयाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी द्यावीत असे लेखी परिपत्रक गटविकास अधिकारी (सर्व पंचायत समिती) यांना काढूनही ग्रामसेवक बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देत नव्हते. याबाबत  बीड जिल्हा बांधकामगार संघटनेच्या  वतीने आंदोलन व सातत्यपूर्ण  पाठपुरावा केला.


      बांधकाम मजूर, गवंडी, प्लंबर, सुतार, पेंटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, काच कामगार, इत्यादी बांधकाम कामगाराच्या सुचीतील सर्व शकामगारांना खात्री करून घेऊन मागील वर्षी 90 दिवस किंवा जास्त दिवस काम  केल्याचे प्रमाणपत्र दयावे असे परिपत्रक ग्राम सेवक / ग्राम विकास अधिकारी (सर्व पंचायत समिती)  सर्व, गट विकास अधिकारी पंचायत समिती  यांच्या नावे दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी काढले आहे. त्यामुळे बीड जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतचे ग्राम सेवक बांधकाम कामगार सुचीतील बांधकाम कामगारांना मागणी केल्यास प्रमाणपत्र  नाकारू शकणार नाहीत. असिक माहीतीसाठी प्रा.बी.जी खाडे 9422243878 1  यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !