11 ऑक्टोबर रोजी प.बंगालमधिल सिलीगुडी येथे होणार सन्मान सोहळा

 सन्मान:बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड

11 ऑक्टोबर  रोजी प.बंगालमधिल सिलीगुडी येथे होणार सन्मान सोहळा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात सातत्याने सामाजिक अभिसरण व सामाजिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अग्रेसर राहत कार्यरत असलेले व सामाजिक  समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम व योगदान देणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना राष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण समजला जाणारा यंदाचाभारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड  2023 नुकताच जाहीर झाला आहे. परळीकरांसाठी ही गौरवाची बाब असून 11 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सन्मान सोहळा होणार आहे.

            भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकरांचा, 11 ऑक्टोबर 1916 रोजी "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" येथे एमएससी (अर्थशास्त्र आणि राजकीय विज्ञान) प्रवेश झाला होता.या प्रवेश दिनाच्या आठवणीत सिलीगुडी प.बंगाल येथे 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3.00 ते संध्याकाळी 6:30 राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषद 2023 होत आहे."भारतात सामाजिक समानता" या विषयावर ही परिषद होणार आहे. या परिषदेत दरवर्षी सामाजिक समानता,राजकीय, सहकार, क्रिडा या विषयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड देवून गौरव केला जातो. ही 5 वी राष्ट्रीय परिषद आहे.या परिषदेचे मुख्य संयोजक तथा भारतीय कर्मचारी मजदूर युनियन केंद्रीय समिती, नवी दिल्लीचे सचिव प्रा.गोरख.जे.साठे यांनी यावर्षीच्या पुरस्काराची नुकतीच घोषणा केली आहे.

         या वर्षीच्या या बहुमानासाठी सामाजिक अभिसरण व सामाजिक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अग्रेसर राहत कार्यरत असलेले व सामाजिक  समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम व योगदान देणारे परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

● बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या उल्लेखनीय कार्याचा होणार सन्मान

      ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजीराव भैय्या धर्माधिकारी विविध स्तरांवर व विविधांगी सामाजिक जडण- घडणीच्या विषयात अग्रेसर राहून कार्यरत आहेत. परळीचे सर्वात तरुण यशस्वी नगराध्यक्ष म्हणून बहुमान, न.प.च्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न, महाशिवरात्रचे पुनरुज्जीवन, प्रथमच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, विविध चौकांचे सुशोभिकरण, पर्यावरण संरक्षण, वृक्ष लागवड जनजागृती मोहीम,विविध स्मशानभूमी सुशोभिकरण, प्लास्टिक मुक्ती अभियान, तक्रार निवारण अभियान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभिकरण या सह असंख्य महत्वकांक्षी प्रकल्प राबविले.युवकांचे संगठन, विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन, युवक जनजागरण मोहीम, दहशदवाद विरोधी . मोहीम, प्रोबोधन उपक्रम व्याखानांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सामुदायिक विवाह सोहळा संयोजन, सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग, विविध आंदोलनात सहभाग. "प्रगतीशील शेतकरी, शेततळ्यांचे निर्माण, केशर आंबा उत्पादन, आधुनिक शेतीचे नवनवे प्रयोग,कृतशील कृषी उपक्रम. स्व. माणिकराव बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांसाठी रुग्णवाहिका, प्रतिवर्षी रक्त तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन, सुशिक्षित बेरोजगार युवकांना अनेक संधी निर्माण करणे, शहरात मोफत पाणीपुरवठा, कायमस्वरूपी पाण्याच्या व्यवस्थेसाठी शहरात विविध ठिकाणी ५० विंधन विहरी, गरजू शाळांना संगणक वाटर फिल्टर वितरण, शैक्षणिक साहित्य वाटप आदि विविध उपक्रम त्यांनी राबवलले आहेत. भीममहोत्सव, अण्णाभाऊ साठे महोत्सव यासारखे सामाजिक अभियांत्रिकी चे यशस्वी प्रयोग त्यांनी राबवले. या सर्व कार्याचा या राष्ट्रीय स्तरावर सन्मान होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !