इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

खालापुरीत जुगार अड्ड्यावर धाड, 12 जुगाऱ्या यासह 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

 जुगार अड्ड्यावर धाड, 12 जुगाऱ्या यासह 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत




शिरूर.....

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिरूर तालुक्यातील खालापूरी येथे एसपीच्या पथकाकडून जुगार अड्ड्यावर छापा टाकला यामध्ये 12 जुगारी व 4 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेविरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथका मार्फत सपोनी गणेश मुंडे यांच्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार दि.5 ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला यावेळी घटना स्थळावर 12 जुगारी,7 मोटारसायकल व रोख 25 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली.या धाडीत 4 लाख 25 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथका मार्फत छाप्याची माहिती शिरूर पोलीसांना कळविल्या नंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या