सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !

 आगळंवेगळं: अक्षदा-पानाच्या विड्यासह मुळपत्रिका: सराटी अंतरवली येथील महासभेला आगत्याने येण्याचे करावे !


परळी वैजनाथ(प्रतिनिधी):- सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असुन विविध माध्यमातून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होत आहे.

      सराटी अंतरवाली येथे  १४ आक्टोंबर रोजी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लाखो संख्येच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची महासभा ऐतिहासिक होणार असुन इतिहासात नोंद होणा-या या सभेचे साक्षीदार होऊन या सभेस सहकुटुंब हजेरी लावावी असे आवाहन गावागावांत विविध माध्यमातून केले जात आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागिल अनेक वर्षांपासून समाज बांधव विविध मार्गाने अंदोलने संपूर्ण राज्यात करत आहे. आता कुठेतरी मनोज जरांगे यांनी राज्य सरकाराला धारेवर धरत आपल्या अंदोलनाचा लढा सराटी अंतरवाली या गावातून सुरु केला आहे. या अंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिली.हे अंदोलन राज्य पातळीवरील झाले. मनोज जरांगे पाटलांच्या राज्यव्यापी दौ-यातही प्रचंड प्रतिसाद बघायला मिळत आहे.




       मुळपत्रिकेला आपल्या समाजजीवनात अतिशय महत्त्व आहेत.अक्षदा,पानाचा विडा-सुपारीसह आगत्याचे निमंत्रण देण्यासाठी मुळपत्रिका दिली जाते. आता या महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुळपत्रिकेच्या माध्यमातून केले जात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सभेचे निमंत्रण देणारी 'मुळपत्रिका' सध्या मोठ्या प्रमाणावर  व्हायरल होतांना दिसत आहे.
-----------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !