युवकांनो आत्महत्या करु नका,आरक्षणाची लढाई तुमच्यासाठीच आहे -मनोज जरांगे पाटील

 युवकांनो आत्महत्या करु नका,आरक्षणाची लढाई तुमच्यासाठीच आहे -मनोज जरांगे पाटील





परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

     तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या वतीने १५ सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी व गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे पाटील मंगळवारी (ता.०३) गाढे पिंपळगाव येथे आले होते. मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांचे ढोलताशांच्या गजरात, जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले.

     यावेळी गाढे पिंपळगावच्या गावकऱ्यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी  करण्यात आली होती. जरांगे पाटील यांचे आगमन होताच ढोलताशांच्या गजरात चार जेसीबीच्या साह्याने फुले टाकून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच स्वागतासाठी गावातील मुख्य रस्त्यावर दुतर्फा भगवे ध्वज, स्वागत कमानी गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा युवकांनी शांततेत आंदोलन करावे, कायदा हातात घेवू नका, हताश होऊन आत्महत्या करु नका तुमच्यासाठीच आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि तुम्ही आत्महत्या केल्यातर आरक्षण कोणासाठी मागायचे म्हणून आत्महत्या करु नका,विश्वास ठेवा आरक्षण मिळणारच आहे. यावेळी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव, युवक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !