परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

 कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा 






        महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ.  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा करण्यात आला.                                            या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र पुराणिक व अध्यक्ष श्री सावता राम राऊत  हे लाभले.यावेळी  सर्व ज्येष्ठ नागरिकांचे  गुलाब पुष्प देऊन केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती बडवे मॅडम यांनी केले, यावेळी  केंद्राचे उपक्रम व माहिती सर्व ज्येष्ठ नागरीक यांना देण्यात आली व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमात श्री उद्धव आघाव साहेब श्री पुराणिक सर श्री तेलंग सर यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्राचे ग्रंथपाल श्री गंगाधर कांबळे यांनी बाप या विषयी सुंदर कविता सादर करून उस्थितांची मन जिंकली,कार्यक्रमाचे आभार वंदना लोखंडे यांनी केले . यासाठी केंद्र संचालक श्री विजय वायाल व कामगार कल्याण अधिकारी श्री प्रसाद धस सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी व निर्मला शिरसाट यांनी परिश्रम घेतले.

---------------------------------------------------


Click-■ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक: अभयकुमार ठक्कर- परळीतील भगवे वादळ

Click-■ कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

Click-आपले धन्यवाद!!! आपल्या सहकार्याने ही वाटचाल सुरु आहे. आपण Subscribe केलचं असेल अद्याप केलं नसेल तर आत्ता नक्की करा.आपल्या मित्रपरिवारालाही Subscribe करायला लावा.










Click-■ सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!