कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू



अंबाजोगाई - सध्या नऊरात्राची लगबग सुरू असून पक्ष पंधरवाड्यामध्ये घरातील कपडे धुण्याचा महिलांचा सपाटा सुरू आहे. यातच दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले असता बारा वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबासाखर ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील साठवण तलावात दररम्याण मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना ते लोखंडी सावरगाव महामार्गावरील नवीन प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लगत असलेल्या तलवामध्ये अंबा कारखाना परिसरातील दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले असता बारा वर्षीय अश्‍विनी लहु जाधव ही मुलगी बुडू लागल्यामुळे वीस वर्षीय रोहित परमेश्‍वर चव्हाण या तरूणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्याच्या नादात त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. या घटनेची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांना कळाल्यानंतर अंबासाखर परिसरातील कार्यकर्त्यांना फोन करून व अंबाजोगाईतील कार्यकर्त्यांना घटनास्थळावर पाठवून दोन्ही मयतांना वाचविण्यासाठी पाठविले. त्यांनी आज दुपारी बारा नंतर तब्बल चार घंटे प्रयत्न करून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची निराशा झाली सुरूवातीला या तरूणांना रोहित चव्हाणचे बॉडी बाहेर काढावी लागली. तर आश्‍विनी या मुलीला शोध घेवून चार वाजता तिचे प्रेत बाहेर काढण्यात यश आले. यातील दोन्ही मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहामध्ये दाखल केले असून त्यांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. सदरील घटनेमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !