परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या - धनंजय मुंडे

 नो फॅलिटिशेशन ओन्ली ॲक्शन : सत्कार नको, कामे सांगा : पालकमंत्री धनंजय मुंडे अ‍ॅक्शन मोडवर !


पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात येताच स्वागत नाकारून धनंजय मुंडे यांनी साधला आष्टी ते बीड विविध गावातील नागरिकांशी संवाद

हार तुरे नको, निवेदने द्या - धनंजय मुंडे

बीड (दि.07) - हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारीत बिडकडे प्रवास केला. नेहमी हार, तुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनाच्या थप्पीने भरलेली दिसत होती!

धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हा वासीयांना खरी प्रतीक्षा होती ती मुंडे यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीची! 

दोन दिवसंपूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते अहमदनगर येथील 'शब्दगंध' या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, आष्टी तालुक्याच्या हद्दी पासून जागोजाग गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. 

धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावून, 'तुमचे हार तुरे नको, आता मला काम करू द्या, कामाची निवेदने द्या' असे म्हणत हार तुरे नाकारले. 

बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली, यावेळी सोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल अप्पा सानप यांसह अनेक पदाधिकारी सोबत होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!