इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

कार्याचा गौरव.........

 रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन: बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने गौरव



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           रक्तदान शिबीरांचे सातत्यपूर्ण आयोजन केल्याबद्दल व या उदात्त कार्याचे ऋणनिर्देश व्यक्त करत बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाचा डाॅ.भालचंद्र रक्तपेढी लातूर च्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला आहे.

             डाॅ.भालचंद्र रक्तपेढी,लातूर द्वारा "रक्तदान शिबीर आयोजक" यांचा कृतज्ञता सोहळा  लातूर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने ॲड.प्रताप धर्माधिकारी यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला.गेल्या १५ वर्षांपासून बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने परळीत  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.या शिबिरात दरवर्षीच विक्रमी संख्येत  रक्तदान होते. अनेक रुग्णांना यामाध्यमातून जीवनदान प्राप्त झालेले आहे. या आयोजनाबद्दल हा गौरव करण्यात आला.

              या कार्यक्रमास पद्मभूषण डाॅ.अशोक कुकडे काका (संस्थापक विवेकानंद रूग्णालय लातुर) श्री.सोमय मुंडे (पोलिस अधिक्षक, लातुर) डॉ.श्री.प्रदिप ढेले (जिल्हा शल्यचिकित्सक, लातुर) मा.श्री.डाॅ.हरिप्रसाद सोमाणी (मा.प्रांतपाल, रोटरी क्लब लातुर) व सर्व आजी माजी संचालक मंडळ डाॅ.भालचंद्र रक्तपेढी, लातुर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!