प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम

 स्मशानभूमीत झाड लावून आणि नाश्ता करून रात्री साजरा करण्यात आला वाढदिवस


परळी अंनिसच्या विकास वाघमारे यांचा क्रांतिकारी उपक्रम


परळी / प्रतिनिधी 


 माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाचे भूत प्रेतामध्ये रूपांतर होते, स्मशानभूमीत रात्री जाणे धोक्याचे असते अशा प्रकारच्या अंधश्रद्धा संपवण्यासाठी चक्क स्मशानभूमीतच रात्री वडाचे झाड लावून आणि सामुदायिक नाश्ता करून परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा अनोखा क्रांतिकारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे विशेष उपस्थिती होती. या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

   परळी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव व युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा वाढदिवस काल रात्री 10  वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे वैशिष्ट म्हणजे रात्री घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजात वैज्ञानिक जनजागृती निर्माण व्हावी, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, प्रेतात्मा, भूत प्रेत याबद्दलची भीती नष्ट व्हावी, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह नष्ट होतो हा संदेश देण्यासाठी तसेच समाजामध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी वडाचे झाड लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वृक्षमित्र सुधाकर देशमुख म्हणाले की देशामध्ये प्रत्येक झाडाची जनगणना व्हावी याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी असा माझा संकल्प असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  प्रा. विलास रोडे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने,ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, माजी नगरसेवक रवी मुळे, अरुण  जाधव, नवनाथ दाने, पृथ्वी शिंदे, यशपाल मुंडे, प्रा प्रदीप बुक्तर विठ्ठल झिलमेवाड,भारत ताटे आदींनी अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक जाणिवा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर विकास वाघमारे यांचा वाढदिवस केक कापून आणि खिचडी आणि भाज्यांचा गरम गरम नाश्ता करून साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक व क्रांतिकारी अशा कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक, कवी बा .सो. कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात वैजनाथ जगतकर यांच्या नाती आणि सावित्रीच्या लेकी मुदिता कांबळे व दिव्यांका जगतकर या लहान बालकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

    उपस्थित सर्वांनी स्मशानभूमीत नाश्ता केल्यानंतर सर्वाधिक ऑक्सिजन आणि सावली देणारे वडाचे झाड लावले. या कार्यक्रमास विकास वाघमारे यांचे कुटुंब 80 वर्षाच्या आजी तसेच पत्रकार दत्तात्रय काळे , पोलीस कर्मचारी सुंदर केंद्रे ,ब्रह्मानंद कांबळे , पत्रकार संदीप मस्के ,सचिन रोडे ,शरण मस्के ,धम्मपाल शिरसागर , संदिप ताटे,प्रदीप भोकरे , वैजनाथ रायभोळे,विनोद रोडे ,नितेश कांबळे ,मारोती वाघमारे ,दिपक गायकवाड,धम्मपाल वाघमारे, गौतम रोडे, विनायक काळे, संदेश आदोडे,सत्यदीप रोडे, अजय रायभोळे, प्रशिक ताटे, अजय कांबळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या