वडखेल येथील ग्रामस्थांची स्मशानभुमी व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

 वडखेल येथील ग्रामस्थांची स्मशानभुमी व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी


परळी / प्रतिनिधी

     परळी तालुक्यातील वडखेल येथील स्मशानभुमीवर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शिवाय स्मशानभुमीवर जाणारा रस्ता अडविला आहे. वडखेल येथील गट क्रमांक ६५ मध्ये स्मशानभुमी आहे. चार आर (गुंठे) जमीन वडखेल येथील स्मशानभुमी साठी आरक्षीत आहे. स्मशाभुमी च्या जागेवर आत्तापर्यंत दोन वेळेस वृक्षारोपण करण्यात आले. परंतु दोन्ही वेळेस लावलेली झाडे लगतच्या शेतकऱ्यांनी काढुन टाकले आहेत. त्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे स्मशानभुमी चे बांधकाम करता आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात देखील उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ गावकऱ्यांवर येते. शिवाय नदी पासुन गावा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत वडखेल येथील ग्रामस्थांनी परळी तहसीलदार यांना बुधवारी (ता.६) निवेदन देऊन रस्ता व स्मशानभुमी वरील अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. निवेदनावर वडखेल येथील विनायक देवकते, दत्ता देवकते, रमेश देवकते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदणाच्या प्रती ग्रामसेवक वडखेल, गटविकास अधिकारी पंचायत समिती परळी, उपविभागीय अधिकारी परळी व जिल्हाधिकारी बीड यांना पाठविण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार