पोस्ट्स

पंकजाताई बीडसाठी सरसच ; जनता त्यांच्या पाठिशी खंबीर - डाॅ. योगेश क्षीरसागर

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डाॅ. योगेश क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसली ताकद बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध रहा ; सतर्क राहून आपापलं बुथ मजबूत करा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन पंकजाताई बीडसाठी सरसच ; जनता त्यांच्या पाठिशी खंबीर - डाॅ. योगेश क्षीरसागर बीड । दि.३ । मी विकासाच्या मुद्यावर निवडणूकीचा प्रचार करत आहे. यापूर्वी पालकमंत्री असताना माझ्या विरोधात असलेल्या लोकांना कधीही मी त्रास दिला नाही, जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. विकास निधी सर्वांना दिला. कोणालाही दुखावले नाही. मात्र इतके सगळे चांगले असतानाही या निवडणूकीत  काही जण जनतेचा बुध्दीभेद करु लागलेत , त्यांच्यापासून दूर रहा. विरोधक कोणताही मुद्दा नसल्याने आम्ही संविधान बदलणार अशी टिका आमच्यावर करत आहेत. बीड जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे ती विरोधकांच्या खोट्या प्रचाराला थारा देणार नाही. आम्ही सर्व समाजाचे आम्ही प्रतिनिधित्व करतो म्हणूनच मी विजयी होणार आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने आपला बूथ सांभाळावा. डोळ्यात तेल घालून सतर्क राहून काम करावं. आपलं मताचे सत्पात्री दान मला द्यावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज येथे

बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोडता मला काही नकोय - पंकजाताई मुंडे

इमेज
बीड मतदार संघ विकासाच्या पाठीशी पंकजाताईंचा विजय आता निश्चित - धनंजय मुंडे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात पंकजाताईच्या विजयासाठी एकवटले बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोडता मला काही नकोय - पंकजाताई मुंडे बीड तालुक्यातील टुकुर प्रकल्पासरख्या मागण्या बहीण-भाऊ मिळून सोडवतील - डॉ.योगेश क्षीरसागर माजी आ.जनार्दन तुपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश बीड (दि. 03) - बीड तालुक्यासह सबंध बीड जिल्ह्यात आता पंकजाताईंच्या विजयाचे वारे वाहू लागले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बीडच्या बाबतीत माझ्याकडून चूक व अन्याय झाला परंतु यावेळी ही चूक भरून काढणार आहे. बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देण्याचे व सबंध जिल्ह्याचे केंद्रात नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या पंकजाताईच्या रूपाने लोकसभेची उमेदवार आपण सक्षम दिली आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केल्यानंतर बीड विधानसभेसाठी सुद्धा योग्य उमेदवार आपण देऊ व सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहू असे मत कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बीड येथील मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.  कें

खा. प्रितमताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन, चनई जिल्हा परिषद गटात झंझावती प्रचार दौरा

इमेज
  पंकजाताईंची गॅरंटी जिल्ह्याने बघितली ; विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मत दया खा. प्रितमताई मुंडे यांचे मतदारांना आवाहन, चनई जिल्हा परिषद गटात झंझावती प्रचार दौरा अंबाजोगाई । दिनांक ०३ मे । महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांच्या विकासाची गॅरंटी आपण सर्वांनी बघितली आहे. त्यांच्या काळात सुरु झालेली विकासाची प्रक्रिया पुढे निरंतर सुरु ठेवण्यासाठी आणि विकासाच्या नवी उंची गाठण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मत दया' असे आवाहन खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना केले. भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा.प्रितमताई मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील चनई जिल्हा परिषद गटात झंझावती दौरा केला. चनई, उमराई, धावडी, केंद्रेवाडी, लाडेवडगाव येथील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. आपल्या बीड जिल्ह्याच वैशिष्ट्य आहे, जिल्ह्यातील मतदार नेहमी विकासाला प्राधान्य देतात. हा आपल्या लोकांचा दृष्टिकोन आहे, लोकांचा हा दृष्टिकोन कायम राहावा ही आपली जवाबदारी असल्याचे खा.मुंडे म्हणाल्या. बीड लोकसभा मतदारसंघातून

आसरडोहमध्ये पंकजाताई मुंडे यांचे रमेश आडसकरांनी केले जबरदस्त स्वागत

इमेज
  बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार आसरडोहमध्ये पंकजाताई मुंडे यांचे रमेश आडसकरांनी केले जबरदस्त स्वागत पंकजाताईंच्या पाठीशी मतांची ताकद उभी करण्याचा निर्धार धारुर । दि.२ । भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे आपल्या जिल्हयाला लाभलेलं एक सक्षम नेतृत्व आहे तर दुसरीकडे समोरचा उमेदवार कोण यापेक्षा त्या उमेदवाराचा अनुभव आपल्या परिसरातील सर्वच लोकांना आलेला आहे, त्याबद्दल वेगळे सांगायची आपल्याला गरज नाही. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांना हाबाडा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत भाजप नेते रमेश आडसकर यांनी विरोधकांचा जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला. दरम्यान आसरडोह येथे काल आडसकर यांनी पंकजाताई मुंडे यांचे जबरदस्त स्वागत केले.     पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी संध्याकाळी आसरडोह येथे झालेल्या पंचक्रोशीतील मतदारांनी मोठी गर्दी केली होती. पंकजाताईंचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत त्यांचं जबरदस्त स्वागत केले. व्यासपीठावर माधवराव निर्मळ यांचेसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.    यावेळी पुढे बोलताना आडसकर म्हणाले, आपल्या जिल्ह्याचा चांगला

अंबाजोगाईत गटनिर्देशक भरत बलुतकर यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात

इमेज
  अंबाजोगाईत  गटनिर्देशक भरत बलुतकर यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात   ............. अंबाजोगाई  अंबाजोगाई येथील  भरत बलुतकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोनपेठ येथून गटनिर्देशक या पदावरून प्रदीर्घ 28 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवागौरव सोहळा अंबाजोगाई मध्ये त्यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. परभणी , मुदखेड , लातूर , सोनपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  त्यांनी आपली सेवा पूर्ण केली आहे. त्यांचे शिक्षण बीएफए ,एटीडी झालेले असून फोटोग्राफीचेही शिक्षण झालेले आहे. त्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक महापुरुषांची उत्तम व आकर्षक छायाचित्रे रेखाटलेली आहेत. ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून वृक्ष लागवड व पर्यावरणाचे संवर्धन हे उपक्रम त्यांनी आपल्या सेवाकाळात राबविले. त्याबद्दल त्यांना विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय

सीटूचा परळीत कामगार मेळावा संपन्न!

इमेज
  कामगारांच्या कष्टातूनच या संपूर्ण जगाची निर्मिती - रोहिदास जाधव सीटूचा परळीत कामगार मेळावा संपन्न! परळी (ता.१) : कामगारांच्या श्रमातूनच या सुंदर जगाची निर्मिती झालेली आहे. म्हणून कामगारांची मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटीला सलाम आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजे जागतिक कामगार दिन आहे. असे मत एसएफआयचे राज्य सचिव व अर्थशास्त्र विषयाचे संशोधक  रोहिदास जाधव यांनी व्यक्त केले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) कामगार संघटनेच्या वतीने आज दिनांक १ मे रोजी परळीत कामगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी रोहिदास जाधव बोलत होते. मेळाव्याची सुरुवात सीटूचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रभाकर नागरगोजे यांच्याहस्ते श्रमिकांच्या लाल झेंड्याचे ध्वज फडकावून करण्यात आली. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शहरातील आर्य समाज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सीटूचे नेते किरण सावजी हे होते. सीटूचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे, जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, ज्येष्ठ नेते प्रा. प्रभाकर नागरगोजे, सुवर्णाताई रेवले यांनी सुद्धा मेळाव्यास मा

तिहेरी आपघात नेकनूरजवळ एक ठार

इमेज
  तिहेरी आपघात   नेकनूरजवळ एक ठार             नेकनुर: नेकनूर परिसरात लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यानी  येळंबघाट रस्त्यावर   मोठ्या प्रमाणात बस्तान बसवले असून बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अशाच लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकून बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली यामध्ये बोलेरो mh 26 .V.3402  मधील एकजण जागीच ठार झाला तर याच ट्रॅक्टर  mh.16 .f.7904 वर आयशर टेम्पो mh 24.AU 7885 धडकला या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत त्यांच्यावर नेकनूर रुग्णालयात उपचार करून बीडला हलवले असून मयताची ओळख पटवण्याचे काम उशीरापर्यंत नेकनूर पोलीसाकडून सुरु होते. 

तिरुका या गावी भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा

इमेज
  समाजाला  दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केले - डॉ.अशोक नारनवरे  तिरुका या गावी भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा ------------------------------------ तिरुका,प्रतिनिधी:- समाजाला  दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केले .असे प्रतिपादन साहित्यिक, विचारवंत तथा प्रख्यात वक्ते डॉ.अशोक नारनवरे  ते तिरुका येथील भीमजयंती मध्ये बोलत होते. विश्वरत्न, भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मौजे  तिरुका या गावी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  बालाजी धोंडीराम पाटील  यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ. प्रा.अशोक नारनवरे ( प्रसिद्ध विचारवंत तथा साहित्यिक, मराठी विभाग ,दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय,औराद शहाजनी)यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यासमयी डॉ. अशोक नारनवरे व कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ. बळीराम पांडे ( प्रख्यात विचारवंत, अर्थशास्त्र विभाग,देवगिरी कॉलेज, छ. संभाजीनगर.)  या दोन्ही वक्त्यांच्या अभ्या

गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात

इमेज
  गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५५ वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता.२९) पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेची उत्साहात सुरुवात करण्यात आली.            दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त सोमवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव पुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला. या हरिनाम सप्ताहात सोमवारी दुपारी २ ते ५ शिव महापुराण कथेचे निरुपण अंकिता माने आळंदीकर या करण आहेत. कथेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी संतोष महाराज सोळंके यांचे किर्तन संपन्न झाले. तर मंगळवारी महादेव महाराज चाकरवाडीकर, बुधवार गोविंद महाराज धोत्रे आळंदी, गुरुवारी अंकिता माने आळंदी, शुक्रवारी कालीदास महाराज अवलगावकर, शनिवारी कृष्णदास महाराज सताळकर,प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन रविवारी १२ ते २ होणार आहे. रोज पहाटे काकडा आरती,७ ते १० ज्ञानेश्वरी प

बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांचा अजित पवार गटात प्रवेश

इमेज
  बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का! बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांचा अजित पवार गटात प्रवेश बीड लोकसभा निवडणुकीतून रविकांत राठोड यांची माघार; महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा अजित पवार गटाकडून रविकांत राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्ही जे एन टी सेल राज्यप्रमुख पदी नियुक्ती धनुभाऊ व पंकजाताई यांचे समाजाला न्याय व बरोबरीने विकासात सामील करण्याचे आश्वासन - रविकांत राठोड रविकांत राठोड यांच्या पाठिंब्यामुळे पंकजाताईंचे पारडे जड! बीड (दि. 30) - बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पूर्वाश्रयीचे शरद पवार गटातील बंजारा समाजाचे नेते तथा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. बीड लोकसभा निवडणुकीतून रविकांत राठोड यांनी माघार घेतली असून आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार गट) व महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दि

धर्मसंस्कार जीवनाचा पाया : अविरत ४४वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद- खा.डॉ. प्रीतमताई मुंडे

इमेज
 ■ परळीत ब्राह्मण सभा आयोजित शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार ! धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन  संस्कार - भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर  धर्मसंस्कार जीवनाचा पाया : अविरत ४४वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद- खा.डॉ. प्रीतमताई मुंडे परळी वै.(प्रतिनिधी)-      धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होते. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत. अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. देव, देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात असे प्रतिपादन प्रसिद्ध भागवताचार्य, कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांनी केले. ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात विविध ठिकाणच्या २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले.            ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४ ४ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २९ मे रोजी शानदार व वैभवी स्व

बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार

इमेज
  बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या  पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार बीडमध्ये आयोजित बैठकीत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केला विश्वास बीड | दिनांक २८। बीड शहराच्या विकास कामात अमूल्य असे योगदान पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना दिलेले आहे.त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बुद्धिभेद करून जातीवाद  करणाऱ्या विरोधकांना  जनता थारा देणार नाही. पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचा विश्वास  नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केला. तर उमेदवार म्हणून मी जिल्ह्यातील जनतेला मान्य आहे आणि हेच माझ्या उमेदवारीचे यश आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली उमेदवारी सार्थकी लावण्यासाठी तुम्ही सर्वजण येत्या 13 तारखेला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विजयी करा, जिल्ह्याचा विकास करून तुमच्या प्रत्येक मताची मी परतफेड करेल अशी ग्वाही याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी दिली. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधल

गेवराईचा विकास पंकजाताईमुळे - आ. पवार

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी गेवराईतील बुथप्रमुखांना केले चार्ज विकास आणि विश्वास हेच आमचे नाते - पंकजाताई मुंडे लोकनेते मुंडे साहेबांनी खूप प्रेम दिलयं, त्या ऋणाची परतफेड करूया - आमदार लक्ष्मण पवार गेवराई ।दिनांक २८। विकास आणि विश्वास हेच आमचे नाते राहीले असून लोकनेते मुंडे साहेबांनी जातीचे गणित मांडून कधी राजकारण केले नाही. मात्र, सध्या जिल्हयात विरोधक अपप्रचार, बुद्धीभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करीत आहेत. तथापि, जिल्ह्य़ातील मायबाप जनतेने जातीय रंग देणाऱ्यांना धडा शिकवून, विकासाची जात बघून मतदान करून,मला एक संधी द्यावी, असे आवाहन बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी येथे बोलताना केले.     दरम्यान, कामामुळे लक्षात राहीले पाहिजे. मुंडे साहेबांवर गेवराई ने खूप प्रेम केलय. पालकमंत्री असताना उतराई होण्याचा प्रयत्न मी केलाय. आमदार लक्ष्मण पवार यांचा शब्द कधी पडू दिला नाही. असे सांगून, पंकजाताई मुंडे यांनी शक्ती प्रमुखांचा क्लास घेऊन कार्यकर्त्यांना जबरदस्त "चार्ज" केले. थेट संवाद साधून पंकजा मुंडे यांनी बैठकीचा मूड चेंज केला तर, आमदार लक्ष्मण पवार यांनी अभ्यासपूर्ण भाषण कर

ब्रह्मविभूषण भागवतमर्मज्ञ ह.भ.प.बाळुमहाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

इमेज
  ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने परळीत उद्या ४४ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ब्राह्मण बहूद्देशीय सभा द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असुन यंदाचे हे या उपक्रमाचे 44 वे वर्ष आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने करण्यात आले आहे.या सोहळ्याला सर्वस्तरीय मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शानदार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.          ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने गेल्या ४३ वर्षापासून अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.दर्शन मंडप श्री वैद्यनाथ मंदिर येथे आज सोमवार, दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 11:12 मी. वाजता  सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ब्रह्मविभूषण भागवतमर्मज्ञ ह

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

इमेज
  अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, नागसेननगर परळी वै येथील फिर्यादीकडे त्याची भोसरी  पुणे येथील १४ वर्षीय भाच्ची आलेली होती.तीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे. या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुरन. 67/2024 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

इमेज
  संतांच्या व्यासपीठावर दोन संघर्ष योद्धे एकत्र मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर! पंकजाताई बसल्या खाली, स्वतः जरांगे पाटलांनी द्यायला लावली खुर्ची पंकजाताईंनी केली पाटलांच्या तब्येतीची विचारपूस गेवराई (प्रतिनिधी) - आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक लोकांना पंकजाताईंना देखील खुर्ची द्यावी अशी सूचना केली. त्याबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजाताईंना देखील बसायला खुर्ची दिली. पंकजाताई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपुसही केली. मागील काही महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा व त्यातच महाराष्ट्रासह देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एक वेगळाच तणाव सध्या वातावरणात आहे. परंतु व

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  संत जगमिञनागा मंदिरचे पुजारी वे.शा.सं. शामराव औटी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             संत जगमित्र नागा मंदिराचे पारंपारिक वंशज पुजारी व विश्वस्त वेदशास्त्रसंपन्न शामराव औटी गुरुजी यांचे आज दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परळीच्या शैक्षणिक व धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.             सेवानिवृत्त शिक्षक असलेले वे.शा.सं. शामराव औटी हे परळीतील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. वयोमान व अल्पशा आजाराने आज दिनांक 25 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 82 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.जुन्या पिढीतील तत्त्वनिष्ठ व आध्यात्मिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शामराव औटी हे अतिशय संयमी, मृदुभाषी, व  सुस्वभावी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.   उद्या अंत्यसंस्कार दरम्यान, कै. शामराव औटी यांच्या पार्थिवावर आज दिनांक 26 रोजी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांचे निवासस्थान असलेल्या जगमित्र नागा मंदिर येथून सकाळी ९ वा.अंत्ययात्रा निघणार आह

१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी.

इमेज
१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी. परळी वैजनाथ: प्रतिनिधी...        १ मे जागतीक कामगार दिनानिमीत परळी येथे 'आर्य समाज मंदिरच्या हॉल मध्ये दुपारी 12 वाजता परळी तालुक्यातील कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.         मेळाव्याचे उद्‌घाटन अर्थशास्त्र तज्ञ, कामगारांच्या प्रश्नांची  सखोल जाण असणारे रोहिदास जाधव करणार आहेत. दरवर्षी १मे कामगार दिन  परळी येथे साजरा केला जातो व तज्ञ कामगार नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाते. मेळाव्यात देशातील कामगारांची परिस्थिती, राज्यातील कामगारांची परिस्थिती व जिल्हयातील कामगारांच्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. कामगारांनी वर्षभर दिलेले लढे, मिळालेले यश व न सुटलेले प्रश्न तसेच राज्यसरकार व केंद्र सरकारची  भूमीका याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.मेळाव्यात शेतकरी नेते मुरलीधर नागरगोजे, कामगार नेते काॅ. प्रभाकर नागरगोजे व सीटू अध्यक्ष प्रा-बी जी खोड यांचे मार्गदर्शन होणार आहे. परळी तालुक्यातील बांधकाम कामगार, आशा कार्यकर्ती, शालेय पोषण आहार कामगार, नगरपालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे

बहिणीच्या रॅलीत पंकजाताई रथात तर धनुभाऊ कार्यकर्त्यांसोबत पायी चालत!

इमेज
  बीडमध्ये धनंजय मुंडेंचे तडाखेबंद भाषण :  महत्वाचे १० मुद्दे धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाने महायुतीची विजयी संकल्प सभा गाजवली * प्लॉटिंगशिवाय थोडीही शेती नावावर नसणारा कारखानदार शेतकरी पुत्र कसा - धनंजय मुंडेंचा घणाघात* * बहुरंगी उमेदवाराचे मराठा आरक्षणाच्या लढ्यात मागील 20 वर्षात काय योगदान? - मुंडेंचा प्रश्न* *मुंडे घराण्याने मराठा सह विविध समाजाच्या कुटूंबातील नेतृत्व घडवले, आमदार-खासदार केले, तेव्हा कधी कोणाची जात पाहिली नाही !*  * धनंजय मुंडेंनी 1952 पासूनच्या खासदारांची मांडली जातींसह यादी* *स्वतः गुपचूप कुणबीचे आरक्षण घेऊन केज खरेदी विक्री संघ निवडणुकीत लाभ मिळवलेला व्यक्ती इतरांना काय न्याय देणार?*  * नगर-बीड-परळी रेल्वे तर धावेलच पण केंद्र व राज्यात एका विचाराचे सरकार राहिल्यास, परळी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पाच वर्षात धावेल - धनंजय मुंडे* * विधानसभा निवडणुकीचे नियोजन फिक्स, कोणीही काळजी करण्याची गरज नाही - मुंडेंनी महायुतीतील नेत्यांना दिला विश्वास! रमेश आडसकरांनी विधनासभेचा विषय काढला आणि संपूर्ण सभेत पिकला हशा!* *मोदींजींच्या नेतृत्वात विकासाचे अविरत पर्व जिल्ह्या

आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल

इमेज
  39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक सहाव्या दिवशी  29 उमेदवारी अर्ज दाखल आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल बीड, दि.24 : (जिमाका)  39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज सहाव्या दिवशी 29 नामनिर्देशन अर्ज दाखल झाली असून आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.  39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 29 उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष), करूणा मुंडे(स्वराज्य शक्ती सेना), हिदायत सादेख अली सय्यद (अपक्ष),अंबादास जाधव (अपक्ष), सादेक हुसेन महम्मद (अपक्ष), संतोष उत्त्म रासवे (अपक्ष), सलाउद्दीन खान पठाण (अपक्ष),गणेश व्यंकटराव कस्पटे (अपक्ष), सादेक इब्राहीम शेख (अपक्ष), अशोक सुखदेव हिंगे (वंचित बहुजन आघाडी), पंकजा गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी चार अर्ज दाखल केले, प्रितम गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले, श्रीराम विठ्ठलराव खळगे (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख(अपक्ष), सुलेमान खैरोद्दीन महमद (अपक्ष),भिमराव जगन्नाथ दळे (अपक्ष),रहेमान बाहोद्दीन सय्यद (अपक्ष), राजेंद्र अच्युतराव होके(अपक्ष), जावेद सिकंदर मोमीन (अपक्ष), लक्ष्मीबाई बाजीराव मोरे

सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा-धनंजय मुंडे

इमेज
 जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले पाच वर्षांसाठी एक संधी द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार ; अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी मतरुपी आशीर्वाद द्या -पंकजाताई मुंडेंचे बीडच्या जाहीर सभेत आवाहन *विरोधी उमेदवार बहुरंगी;* *जातीधर्माच्या नव्हे तर विकासाच्या मुद्यावर जिल्हा* सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पंकजाताईंना बहुमताने विजयी करा-धनंजय मुंडे *बीडच्या विराट सभेत महायुतीच्या एकजुटीचे दर्शन* बीड । दिनांक २४। नि:स्वार्थ प्रेम करणारी जनता माझ्यासोबत आहे. जिल्ह्यातील सर्व जनता हेच माझे वैभव आहे, मात्र कांही जणांची दृष्ट याला लागते. निवडणूकीत गाफील राहू नका. मी एका पराभवाला सामोरे गेले आहे. पराभवानंतर जनतेच्या साक्षीने मी समाजकारणात राहिले.अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले, त्यानंतर आता मला संधी मिळाली आहे. ही निवडणूक अवघड आहे. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणणार नाही, कारण ज्या दिवशी मुंडे साहेबांच्या गळ्यात हार घालायचा होता, त्याचवेळी त्यांचेवर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. त्यामुळे आपले त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी या लोकसभेत आपल्याल