मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

 संतांच्या व्यासपीठावर दोन संघर्ष योद्धे एकत्र


मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!


पंकजाताई बसल्या खाली, स्वतः जरांगे पाटलांनी द्यायला लावली खुर्ची


पंकजाताईंनी केली पाटलांच्या तब्येतीची विचारपूस


गेवराई (प्रतिनिधी) - आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक लोकांना पंकजाताईंना देखील खुर्ची द्यावी अशी सूचना केली. त्याबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजाताईंना देखील बसायला खुर्ची दिली. पंकजाताई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपुसही केली.


मागील काही महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा व त्यातच महाराष्ट्रासह देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एक वेगळाच तणाव सध्या वातावरणात आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आज संतांच्या ठायी जातीच्या भिंती गळून पडल्याचे पाहायला मिळाले. 


पंकजा मुंडे यांनी देखील आजपर्यंत कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केलेला नाही किंवा अशा आरक्षण विरोधी कोणत्याही व्यासपीठावर कधीही पंकजा मुंडे गेलेल्या नाहीत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंकजाताई मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, असे स्पष्ट केलेले आहे.


स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी कधीही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही किंवा याला मत द्या असे आवाहन केलेले नाही, इतकेच नव्हे तर पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना आम्ही मराठा आरक्षण विरोधी मानत नाही, अशीही जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती.  अशाही परिस्थितीत काही जणांकडून समाजात दुही माजेल असे  वेगळे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याला आज या दोघांच्या एकत्र येण्याने उत्तर मिळाले असून हा क्षण नक्कीच दोन्ही समाजातील दुही कमी करणारा आणि सुखावणारा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.


दरम्यान लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर देखील मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण केले जात असल्याचे दिसून येते, त्यामध्ये सबंध बीड जिल्हा ढवळून निघाला असताना आज जरांगे पाटील व पंकजा मुंडे यांच्यातील हे क्षण व संवाद हा सुखावणारा होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !