इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 संत जगमिञनागा मंदिरचे पुजारी वे.शा.सं. शामराव औटी यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

            संत जगमित्र नागा मंदिराचे पारंपारिक वंशज पुजारी व विश्वस्त वेदशास्त्रसंपन्न शामराव औटी गुरुजी यांचे आज दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने परळीच्या शैक्षणिक व धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

            सेवानिवृत्त शिक्षक असलेले वे.शा.सं. शामराव औटी हे परळीतील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. वयोमान व अल्पशा आजाराने आज दिनांक 25 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 82 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.जुन्या पिढीतील तत्त्वनिष्ठ व आध्यात्मिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शामराव औटी हे अतिशय संयमी, मृदुभाषी, व  सुस्वभावी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

 उद्या अंत्यसंस्कार

दरम्यान, कै. शामराव औटी यांच्या पार्थिवावर आज दिनांक 26 रोजी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांचे निवासस्थान असलेल्या जगमित्र नागा मंदिर येथून सकाळी ९ वा.अंत्ययात्रा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या