१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी.

१ मे जागतीक कामगार दिनी परळी येथे कामगारांचा मेळावा- प्रा. खाडे. बी.जी.


परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

       १ मे जागतीक कामगार दिनानिमीत परळी येथे 'आर्य समाज मंदिरच्या हॉल मध्ये दुपारी 12 वाजता परळी तालुक्यातील कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

        मेळाव्याचे उद्‌घाटन अर्थशास्त्र तज्ञ, कामगारांच्या प्रश्नांची  सखोल जाण असणारे रोहिदास जाधव करणार आहेत. दरवर्षी १मे कामगार दिन  परळी येथे साजरा केला जातो व तज्ञ कामगार नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाते. मेळाव्यात देशातील कामगारांची परिस्थिती, राज्यातील कामगारांची परिस्थिती व जिल्हयातील कामगारांच्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे. कामगारांनी वर्षभर दिलेले लढे, मिळालेले यश व न सुटलेले प्रश्न तसेच राज्यसरकार व केंद्र सरकारची  भूमीका याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.मेळाव्यात शेतकरी नेते मुरलीधर नागरगोजे, कामगार नेते काॅ. प्रभाकर नागरगोजे व सीटू अध्यक्ष प्रा-बी जी खोड यांचे मार्गदर्शन होणार आहे. परळी तालुक्यातील बांधकाम कामगार, आशा कार्यकर्ती, शालेय पोषण आहार कामगार, नगरपालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, आशा' चे नेते किरण सावजी, जालिंदर गिरी, प्रकाश वाघमारे व शेख जावेद यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!