तिरुका या गावी भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा

 समाजाला  दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केले - डॉ.अशोक नारनवरे



 तिरुका या गावी भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा

------------------------------------

तिरुका,प्रतिनिधी:-

समाजाला  दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केले .असे प्रतिपादन साहित्यिक, विचारवंत तथा प्रख्यात वक्ते डॉ.अशोक नारनवरे  ते तिरुका येथील भीमजयंती मध्ये बोलत होते.

विश्वरत्न, भारतरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मौजे  तिरुका या गावी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  बालाजी धोंडीराम पाटील  यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ. प्रा.अशोक नारनवरे ( प्रसिद्ध विचारवंत तथा साहित्यिक, मराठी विभाग ,दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय,औराद शहाजनी)यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यासमयी डॉ. अशोक नारनवरे व कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ. बळीराम पांडे ( प्रख्यात विचारवंत, अर्थशास्त्र विभाग,देवगिरी कॉलेज, छ. संभाजीनगर.)

 या दोन्ही वक्त्यांच्या अभ्यासू  भाषणाने सर्व उपासक आणि उपसिकांचे  गावातील नागरिकांचे प्रबोधन झाले.  माननीय डॉ. अशोक नारनवरे  व डॉ. बळीराम पांडे  भाषणाने एक चैतन्य निर्माण झाले.यासमयी डॉ.नारनवरे यांनी डॉ.बाबासाहेबांचा विचार केवळ ऐकून न घेता तो आपल्या प्रत्यक्ष  आचरणात आणणे आवश्यक आहे.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून,  कार्यातून,आंदोलन चळवळीतून शिक्षणाचे महत्त्व बहुजन समाजाला समजले.

 डॉ.बाबासाहेबांच्या विचारामुळे, बहुजन समाज आपल्यावर लादलेल्या गुलामगिरीविरुद्ध  लिहू लागले, व्यवस्थेत आपले स्थान शोधू लागले, व्यवस्थेला जाब विचारू लागले,  निर्भय व मूल्यात्मक जाणीवांनी  समाज बंड करून उठला.समाजाला एक दिशा देण्याचे काम त्यांच्या विचारांनी केले.

यासमयी डॉ. बळीराम पांडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेबांमुळे  माणसांचा  स्वाभिमान जागा झाला. नीतिमत्ता आणि स्वाभिमानाला त्यांनी अग्रस्थान दिले.

समाज या विचाराच्या पातळीवर उभा राहू शकला कारण "मोडेन पण वाकणार नाही" ही त्यांची परिणती होती.डॉ.पांडे म्हणाले की,

 डॉ. बाबासाहेबांनी,भारतीय राज्यघटनेतून जुन्या स्मृतींना मागे टाकून नवे स्मृतीशास्त्र  स्वतंत्र भारताला दिले. शिवाय लोकशाही समाजवादाचे, सामाजिक लोकशाहीचे म्हणजे स्वातंत्र्य, समता, व बंधुत्वाचे बिजारोपण त्यांनी केले.असे प्रतिपादन डॉ. पांडे यांनी केले.

 अध्यक्षीय भाषणात मा. बालाजी पाटील यांनी ,समग्र बाबासाहेब समजून घेण्याची आवश्यकता आहे असे मत मांडले.

 कार्यक्रमाला मा. मारोती गोविंदराव पांडे (तालुकाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जळकोट. तथा संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,लातूर  ) मा. रामराव राठोड, मा. प्रदीप काकडे साहेब, (पोलीस निरीक्षक ,जळकोट) मा.सुनीताताई खटके (सरपंच, तिरुका), मा. श्रीकृष्ण पाटील( माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट,) मा.धोंडीराम पाटील (माजी सभापती, पंचायत समिती जळकोट ) मा.गोविंद पाटील  (माजी चेअरमन,तिरुका ), मा.रतन पाटील (चेअरमन,तिरुका ), मा. गंगाधर पाटील( पोलीस पाटील, तिरुका) मा.रमा कारभारी, मा. गंगाधर गुरुजी (तंटामुक्ती अध्यक्ष ),  राजीव सगर ( माजी सरपंच,तिरुका)  मा. संपत पाटील, सूर्याजी मुंडकर अरविंद पाटील,शरद पाटील (सहशिक्षक ), मा.अंगद जाधव 

 जयंती समितीचे अध्यक्ष राजीव संभाजी सोनकांबळे, उपाध्यक्ष, मनोहर लक्ष्मण गायकवाड व संयोजन समितीचे सदस्य कोंडीबा सवारे,{ माजी सरपंच, तिरुका ), राजू सवारे (आरपीआय शाखाध्यक्ष, तिरुका ), बालाजी सवारे (आरपीआय उपाध्यक्ष, तिरुका )तसेच संघर्ष मित्र मंडळ,तिरुका आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकट सवारे यांनी केले तर आभार  प्रा. दत्ता सवारे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !