युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात

 गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५५ वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता.२९) पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. 

          दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त सोमवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव पुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला. या हरिनाम सप्ताहात सोमवारी दुपारी २ ते ५ शिव महापुराण कथेचे निरुपण अंकिता माने आळंदीकर या करण आहेत. कथेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी संतोष महाराज सोळंके यांचे किर्तन संपन्न झाले. तर मंगळवारी महादेव महाराज चाकरवाडीकर, बुधवार गोविंद महाराज धोत्रे आळंदी, गुरुवारी अंकिता माने आळंदी, शुक्रवारी कालीदास महाराज अवलगावकर, शनिवारी कृष्णदास महाराज सताळकर,प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे किर्तन रविवारी १२ ते २ होणार आहे. रोज पहाटे काकडा आरती,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी अंकिता खांडगे यांची १ ते ५ शिव कथा, सायंकाळी ६ ते ७ धुप आरती होणार आहे. तर मुख्य पालखी सोहळा रविवारी (ता.०५) रात्री १२ वाजता श्री.पापदंडेश्वर मंदिरातून निघणार असून रात्री पालखी मार्गावर भारुडे, सकाळी गवळणी व मंगळवारी दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यास व अखंड हरिनाम सप्ताहास व शिवपुराण कथेस पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या