ब्रह्मविभूषण भागवतमर्मज्ञ ह.भ.प.बाळुमहाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

 ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने परळीत उद्या ४४ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा


मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ब्राह्मण बहूद्देशीय सभा द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असुन यंदाचे हे या उपक्रमाचे 44 वे वर्ष आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने करण्यात आले आहे.या सोहळ्याला सर्वस्तरीय मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शानदार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

        ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने गेल्या ४३ वर्षापासून अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.दर्शन मंडप श्री वैद्यनाथ मंदिर येथे आज सोमवार, दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 11:12 मी. वाजता  सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ब्रह्मविभूषण भागवतमर्मज्ञ ह.भ.प.बाळुमहाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वे.शा.सं. मनोहरदेव जोशी यांच्या व समस्त ब्रह्मवृंद क्षेत्ररपाध्यायांच्या वैदिक अधीपत्याखाली हा व्रतबंध सोहळा संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळयात विविध ठिकाणच्या २१ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. 

          तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना, पुरोहित संघटना आदींनी केले आहे.

या बटुंवर होणार उपनयन संस्कार...                                       १. चि. सर्वेश सचिन येवतेकर, परळी वैजनाथ.२. चि. चिन्मय धनंजय नाईक, परळी वैजनाथ.३. चि. आरव कल्पेश पाथ्रीकर, परळी वैजनाथ.४. चि. रिशांक श्रीपाद पांडे, परळी वैजनाथ.५. चि. चैतन्य नलेश कुलकर्णी, गिरवली.६. चि. तन्मय गणेश वकिल, लातूर.७. चि. तुषार गणेश वकिल, लातूर.८. चि. प्रतिक प्रकाशराव पाटील, गंगाखेड.९. चि. श्रेयश शशिकांतराव बोरगांवकर, पूणे.१०. चि. श्रीनिवास मुरलीधर कुलकर्णी, पूणे.११. चि. श्रेयस रमाकांत कुलकर्णी, खपाट पिंपरी.१२. चि. समर्थ श्रीराम पांडे, माजलगांव.१३. चि. समर्थ श्रीकांत कुलकर्णी, उजनी.१४. चि. साहिल भास्करराव टेकाळे, छ. संभाजीनगर.१५. चि. अवधुत कृष्णा कुलकर्णी, परभणी.१६. चि. दुर्गेश दत्तात्रय कुलकर्णी, परभणी१७. चि. आर्यन संतोष वडगांवकर, पट्टीवडगांव.१८. चि. शौनक शैलेश माळवटकर, वसमत.१९. चि. अजिंक्य गोविंदराव जोशी, हाडोळती, ता. अहमदपूर.२०. चि. समर्थ विवेकराव पांडे, नांदेड.२१. चि. सात्विक संदिप कुलकर्णी, तेलंगणा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार