बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांचा अजित पवार गटात प्रवेश

 बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का!




बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांचा अजित पवार गटात प्रवेश


बीड लोकसभा निवडणुकीतून रविकांत राठोड यांची माघार; महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा


अजित पवार गटाकडून रविकांत राठोड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्ही जे एन टी सेल राज्यप्रमुख पदी नियुक्ती


धनुभाऊ व पंकजाताई यांचे समाजाला न्याय व बरोबरीने विकासात सामील करण्याचे आश्वासन - रविकांत राठोड


रविकांत राठोड यांच्या पाठिंब्यामुळे पंकजाताईंचे पारडे जड!


बीड (दि. 30) - बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पूर्वाश्रयीचे शरद पवार गटातील बंजारा समाजाचे नेते तथा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.


बीड लोकसभा निवडणुकीतून रविकांत राठोड यांनी माघार घेतली असून आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार गट) व महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 


आपल्यासाठी पोहरादेवी गडाचा शब्द हा प्रमाण असून निवडणुकीतून माघार घ्यावी व पंकजाताईंना पाठिंबा द्यावा अशा सूचना मला पोरा देवी गडाकडून आल्या. केंद्रात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल हे निश्चित असून पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या खासदार झाल्यावर निश्चितच पहिल्या ओळीत बसतील व त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचा त्याचबरोबर बंजारा समाजाचाही मोठ्या प्रमाणात विकास होईल. समाजाला गृहीत न धरता समाजाच्या मूलभूत सुविधा, त्यांचे न्याय हक्क तसेच विकासात बरोबरीचा वाटा देण्याचे आश्वासन मला धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी दिले असल्याचे रविकांत राठोड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 


बंजारा समाजाला राज्यस्तरावर महामंडळाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे आश्वासन मला धनंजय मुंडे व पंकजाताई यांनी दिले असल्याचे रविकांत राठोड म्हणाले. 


मला शरद पवार साहेबांकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. याबाबत मी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा देखील केली होती. परंतु पक्षाकडून निष्ठावंत सोडून धनशक्ती असलेला उमेदवार शोधला गेला. मात्र तरीही मी पवार साहेबांवर नाराज नाही, असेही रविकांत राठोड पुढे बोलताना म्हणाले.


दरम्यान रविकांत राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या व्ही जे एन टी सेलच्या राज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


रविकांत राठोड यांचा हा पक्षप्रवेश व त्यांनी दिलेला पाठिंबा यामुळे बंजारा समाज एकजुटीने ताईंच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला असून, या घडामोडीमुळे पंकजाताई मुंडे यांचे पारडे आणखीनच जड झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !