इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल

 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक सहाव्या दिवशी  29 उमेदवारी अर्ज दाखल


आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल

बीड, दि.24 : (जिमाका)  39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज सहाव्या दिवशी 29 नामनिर्देशन अर्ज दाखल झाली असून आजपर्यंत एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत.


 39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 29 उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत. यामध्ये कोळेकर गणेश भाऊसाहेब (अपक्ष), करूणा मुंडे(स्वराज्य शक्ती सेना), हिदायत सादेख अली सय्यद (अपक्ष),अंबादास जाधव (अपक्ष), सादेक हुसेन महम्मद (अपक्ष), संतोष उत्त्म रासवे (अपक्ष), सलाउद्दीन खान पठाण (अपक्ष),गणेश व्यंकटराव कस्पटे (अपक्ष), सादेक इब्राहीम शेख (अपक्ष), अशोक सुखदेव हिंगे (वंचित बहुजन आघाडी), पंकजा गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी चार अर्ज दाखल केले, प्रितम गोपीनाथराव मुंडे (भारतीय जनता पक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले, श्रीराम विठ्ठलराव खळगे (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख(अपक्ष), सुलेमान खैरोद्दीन महमद (अपक्ष),भिमराव जगन्नाथ दळे (अपक्ष),रहेमान बाहोद्दीन सय्यद (अपक्ष), राजेंद्र अच्युतराव होके(अपक्ष), जावेद सिकंदर मोमीन (अपक्ष), लक्ष्मीबाई बाजीराव मोरे (अपक्ष), रविकांत अंबादास राठोड (अपक्ष), देविदास यशवंत शिंदे (अपक्ष), पठाण अमजद जिलानी (अपक्ष), पठाण सरफराज बाबखाँ(अपक्ष), जावेद सलीम सय्यद (टिपू सुलतान पार्टी)


असे एकूण  29 नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष सादर केले आहेत.


आज पर्यंत एकूण 117 इच्छुक उमेदवारांना 262 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.


 सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!