अंबाजोगाईत गटनिर्देशक भरत बलुतकर यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात

 अंबाजोगाईत  गटनिर्देशक भरत बलुतकर यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात  



.............

अंबाजोगाई 

अंबाजोगाई येथील  भरत बलुतकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोनपेठ येथून गटनिर्देशक या पदावरून प्रदीर्घ 28 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवागौरव सोहळा अंबाजोगाई मध्ये त्यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. परभणी , मुदखेड , लातूर , सोनपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  त्यांनी आपली सेवा पूर्ण केली आहे. त्यांचे शिक्षण बीएफए ,एटीडी झालेले असून फोटोग्राफीचेही शिक्षण झालेले आहे. त्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक महापुरुषांची उत्तम व आकर्षक छायाचित्रे रेखाटलेली आहेत. ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून वृक्ष लागवड व पर्यावरणाचे संवर्धन हे उपक्रम त्यांनी आपल्या सेवाकाळात राबविले. त्याबद्दल त्यांना विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्थेचा संपूर्ण परिसर ग्रीन बेल्ट करून विविध झाडांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून  संपूर्ण परिसर हिरवागार केला होता. त्याबद्दल त्यांना परभणी महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांच्या हस्ते ' पर्यावरण मित्र ' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी टाटा , महिंद्रा यासारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. नाशिक येथे मरीन उद्योग , हिंदुस्थान ऍरोनॉटिक या विमान स्पेअर पार्ट तयार करणाऱ्या कंपनीमध्येही त्यांचे काही विद्यार्थी कार्यरत आहेत. विविध नामांकित कलरच्या कंपन्यांमध्ये सुद्धा यांचे विद्यार्थी महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. भरत बलुतकर यांच्या सेवा गौरव सोहळ्यानिमित्त प्राचार्य  सी सी देशपांडे , आकडे सर  ,पांडे सर लातूर , व्ही डी काळे सर, छापरवाल सर परभणी , श्रीमंत ओव्हाळ सर उस्मानाबाद, अमृतवार सर ,लाखे सर, नांदेड पुजारी सर , आसद सर परळी दिलीप दारव्हेकर सर , पतंगे सर आखाडा बाळापूर ,अंबाजोगाई येथील युवा नेते अक्षय भैया मुंदडा , राजकिशोरजी मोदी अध्यक्ष पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अंबाजोगाई ,रमण सोनवळकर , संचालक योगेश्वरी शिक्षण संस्था, संचालक अरुण काळे , भाजपाचे नगरसेवक सुरेश कराड , नगरसेवक मनोज लखेरा, दिलीप काळे , ॲड मकरंद पत्की  अध्यक्ष दीनदयाळ नागरी सहकारी बँक , संजय सत्वधर मार्केटिंग कमिटी चेअरमन झरी , पुंड साहेब वनविभाग परभणी , रमेश राठोड साहेब , बालाजी धगडे साहेब पुणे , सुरेंद्र देशपांडे  स्टेट बँक हैदराबाद परभणी , डॉ. केतन सत्वधर मानवत ,कल्याण काळे साहेब रिलायंस इन्शुरन्स, योद्धा ग्रुपचे सर्व सदस्य,अनेक विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच त्यांचे वर्गमित्र, अंबाजोगाई शिक्षणक्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील उद्योजक , नगरसेवक , राजकीय पक्षांचे नेते , पाहुणेमंडळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !