पंकजाताई बीडसाठी सरसच ; जनता त्यांच्या पाठिशी खंबीर - डाॅ. योगेश क्षीरसागर

 पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डाॅ. योगेश क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसली ताकद


बुद्धिभेद करणाऱ्यापासून सावध रहा ; सतर्क राहून आपापलं बुथ मजबूत करा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन


पंकजाताई बीडसाठी सरसच ; जनता त्यांच्या पाठिशी खंबीर - डाॅ. योगेश क्षीरसागर


बीड । दि.३ ।

मी विकासाच्या मुद्यावर निवडणूकीचा प्रचार करत आहे. यापूर्वी पालकमंत्री असताना माझ्या विरोधात असलेल्या लोकांना कधीही मी त्रास दिला नाही, जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. विकास निधी सर्वांना दिला. कोणालाही दुखावले नाही. मात्र इतके सगळे चांगले असतानाही या निवडणूकीत  काही जण जनतेचा बुध्दीभेद करु लागलेत , त्यांच्यापासून दूर रहा. विरोधक कोणताही मुद्दा नसल्याने आम्ही संविधान बदलणार अशी टिका आमच्यावर करत आहेत. बीड जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे ती विरोधकांच्या खोट्या प्रचाराला थारा देणार नाही. आम्ही सर्व समाजाचे आम्ही प्रतिनिधित्व करतो म्हणूनच मी विजयी होणार आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने आपला बूथ सांभाळावा. डोळ्यात तेल घालून सतर्क राहून काम करावं. आपलं मताचे सत्पात्री दान मला द्यावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले. तर बीडची सुज्ञ जनता पंकजाताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे डाॅ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.


  राष्ट्रवादीचे बीड विधानसभेेचे नेते डॉ.योगेश व डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित विजयी संकल्प कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ. योगेश क्षीरसागर,डॉ. सारिका क्षीरसागर,जनार्धन तुपे, प्रज्ञा खोसरे, कल्याण आखाडे, बाप्पासाहेब घुगे, सुनील झोडगे, सुधीर काकडे, भास्कर जाधव यांच्यासह नगर पालकेचे सभापती, नगरसेवक, विविध सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


 कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या,मी पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गाचे कामे केली. यासह अनेक योजना राबवल्या, हे काम जनतेला दिसते.त्यामुळेच पाच वर्ष मी सत्तेसोबत नसतानाही माझी जनता माझ्यासोबत राहिली. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आहे, सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे. सन्मानाचा विजय मिळवून देण्यासाठी तुमचे योगदान या निवडणुकीत मला द्या. आपला विकासाचा विचार गावागावात पोहचला आहे. लोक आता मतदानासाठी उत्साहित आहेत. आजपर्यंतच्या राजकारणात आम्ही कधी कुणाचा द्वेष केला नाही, विकास आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व समाज घटकांच्या हितासाठी काम केलं आहे. जिल्ह्यात मी ठिकठिकाणी मतदारांना मते मागत असताना त्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे.   साडेतीन खासदारांच्या मागे उभे राहायचे की 350 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार्‍या पक्षासोबत रहायचे हे जनतेला चांगले कळते. मुंडे साहेबाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला येत्या 4 तारखेला विजयी सभा घ्यायची आहे. निवडणूक ही देशाची आहे. देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे जाणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास समोर ठेवून मतदारांनी इतर कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपला मतदान करावे.  तुमच्या गावात तुमची किती मते आहेत हे या निवडणुकीत दाखवून देण्याची संधी कार्यकर्त्यांना आहे. जातीपातीचे राजकारण करणार्‍यापासून दूर रहा. मला प्रचंड मतांनी विजयी करून दिल्लीला पाठवा  असे आवाहन  केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मताधिक्य वाढवण्यासाठी बूथ मजबूत करण्याचे काम करावे, लवकरच मोदींजींची बीडला सभा होत आहे.या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन त्यांनी केले.


*धनंजय मुंडे*

----

जिल्हयात सात लाख हेक्टर जमीन कोरडवाहू आहे ही सर्व जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी आपण पंकजाताई याना विजयी करा. महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकदिलाने काम करत आहोत. जिल्ह्यात विकासाचे, सिंचनाचे अनेक प्रकल्प राबवत आहोत,  राजकारणात मी सक्रिय झालो तेव्हा बीड जिल्ह्यात कधीच जातपात नव्हती. सर्व जातीचे लोक बीडमधून खासदार झाले, हा बीड जिल्ह्याचा सर्वधर्मसमभावाचा राजकीय इतिहास आहे. इथे जात पाहून नव्हे तर व्यक्तीचे कर्तृत्व पाहून उमेदवाराला निवडून देणारी जनता आहे. कोणी कोणाच्या जातीत जन्माला यावं हे आपल्या हातात नसत. त्यामुळे जातिवादाला महत्व देऊ नका. देश विकासासोबत  जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ही निवडणूक आहे. पंकजाताई मुंडे यांना खासदार म्हणून मोदींजींच्या पाठीशी उभे करा.


*आम्हाला पंकजाताईंना केंद्रात मंत्रीपदी पहायचयं-डॉ.सारिका क्षीरसागर*

-----

 पंकजाताई आपल्या रूपाने ही लक्ष्मी बीड जिल्ह्यात यावी. आम्हाला सारे जण विचारतात की, तुम्ही खूप मनावर घेऊन प्रचार करतात, आम्ही सांगतो की, आम्हाला पंकजाताई यांना केंद्रात मंत्री म्हणून काम करताना पहायचे आहे, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत ताईंसाठी 100 टक्के काम करणार आहो. पंकजाताई म्हणजे विश्वसनीय आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. क्षीरसागर परिवार आणि मुंडे परिवारांचे नाते घट्ट राहिलेले आहे. तसेच सर्व कार्यकर्ते आज आपल्या परिवारात आहेत. हे सर्व कार्यकर्ते तळागाळातील आहेत. सामान्य माणसांशी यांची नाळ जुळलेली आहे त्यामुळे पंकजाताई यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे. 


*डॉ.योगेश क्षीरसागर*

------

आम्ही सर्वांनी मनावर घेतले आहे, पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हाती देशाचे हित आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला पंकजाताई मुंडे यांना निवडून आणायचे आहे.मोदींजींनी पंकजाताई मुंडे यांना केवळ खासदार करण्यासाठी उमेदवारी दिली नाही तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंकजाताई यांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. पालकमंत्री असताना पंकजाताई यांनी ग्रामीण रस्ते तसेंच इतर विकासाच्या योजना बीड जिल्ह्यात आणल्या,त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात आताही बीड जिल्ह्यात विकास कामाचा वेग कायम आहे, समोरच्या उमेदवाराचे कोणतेही काम नाही,त्यामुळे ते काय काम करणार हे दिसून येते. आपला विकास कोण करू शकते हे बीडच्या जनतेला चांगले कळत म्हणूनच पंकजाताई मुंडे यांना विजयी करायचे आहे. पंकताईंनी कधीही जातीभेद केला नाही. त्यामुळे बीडची जनता येत्या 13 तारखेला पंकजाताई यांना विक्रमी मतदान करेल आणि 4 जून रोजी पंकजाताई मुंडे या प्रचंड मतांनी विजयी झालेल्या असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !