पोस्ट्स

गित्ते भावंडांनी मिळवली गायन व वादनात विशेष योग्यता

इमेज
*कु.श्रेया व चि.आरव या  गित्ते भावंडांचे संगीत  परिक्षेत घवघवीत यश*   ● _गायन व वादनात मिळवली विशेष योग्यता_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...         संगीत विषयातील गायन परिक्षेत कु. श्रेया मधुकर गित्ते हिने आणि तबला वादन परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते या बहिण - भावांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे या परिक्षेत गित्ते भावंडांनी   गायन व वादनात विशेष योग्यता मिळवलीआहे.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०१८ या सत्राचा संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये गायन या विषयात कु. श्रेया मधुकर गित्ते हिने परिक्षा प्रविष्ट केली होती. या परिक्षेत तीने घवघवीत यश संपादन केले. तिने पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. तर चि.आरव मधुकर गित्ते याने तबला या विषयात वादन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. त्यांना परळी येथील गुरुकृपा संगीत विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत दहिफळे यांचे मार्गदर्शन लाभ
इमेज
बुधवारची एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी; धार्मिक दृष्ट्या दुर्मिळ योगायोग ! ● गीताजयंती,एकादशी, द्वादशी, त्रयोदशी युक्त वार● परळी वैजनाथ / रविंद्र जोशी.......           पंचागानुसार वार, तिथी , नक्षत्र आदींसह अन्य बाबींचा धार्मिक दृष्टीने विचार केला जातो. या मध्ये अनेक वेळा अनेक तिथी वृद्धी -क्षय होतो. परंतु यातून निर्माण होणारे तिथीबदल व योग याचे अत्यंत महत्त्व समजले जाते. अशाच प्रकारे अनेक वर्षांनंतर असा धार्मिकदृष्ट्या दुर्मिळ योग आजच्या बुधवार (दि. १९) रोजी आलेल्या एकादशीबाबतही आहे. ही  एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी आहे.गीताजयंती, एकादशी, द्वादशी,त्रयोदशीयुक्त असा एकत्रितपणे हा  वार असून अनेक वर्षानंतर असा योगायोग आल्याचे पंचाग अभ्यासक व अध्यात्मिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रा. व्ही. बी.देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

इमेज
* आज "बेटा" शब्द - नि:शब्द .........!*                                  -  ♦ प्रा. रविंद्र जोशी ♦       एक वेगळा बाज, दिमाखदार व शाही वर्तन जे काही असेल ते धडक - बेधडक मांडण्याची नैसर्गिक वृत्ती आणि परळीत कोणीही असो त्याला चार चांगले शब्द सांगण्याचा -सुनावण्याची अधिकारवाणी असलेले प्रा. व्ही.बी.देशपांडे यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाने ते सर्वपरिचित होतेच त्याहीपेक्षा वडीलकीच्या नात्याला परिपूर्ण जपणारे व्यक्तीमत्व होते. प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा " बेटा" हा शब्द आज त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य बनलेला हा शब्द होता. आदरणीय सरांच्या जाण्याने जणू  "बेटा" शब्द - नि:शब्द झाला आहे असे वाटते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे परळी (प्रतिनिधी)          भारताचे माजी पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी .मुंडे (सर )यांनी केले       परळीतील संपर्क कार्यालयांमध्ये डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉ. मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते फारुख भाई ,महेमुद भाई ,बाबा शेख , इलियास भाई काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जम्मू सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजिद, गफार भाई बागवान ,शेख फैय्याज ,मतीन मणियार, शेख सिकंदर, शेख जावेद, मुईज नवाब आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते        पुढे बोलताना प्रा .टी.पी .मुंडे (सर )म्हणाले की डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जीवन तरुणांना प्रेरणा देणारे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्यामुळेच आज देश

धनंयज मुंडेंनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा

इमेज
शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या धनंयज मुंडेंनी मांडल्या  मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बीड दि.12.......... मुख्यमंत्री महोदय यावर्षी 1972 वर्षापेक्षाही भिषण दुष्काळ आहे, तुम्ही कागदावर दुष्काळ जाहिर केला असला तरी, उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना खरोखरच आधार द्यायचा असेल तर हेक्टरी 50 हजार रूपये तातडीने मदत द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यंानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  बीड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज जिल्ह्यात आले होते, मागील 8 दिवसांपासून दिवाळीचा सण साजरा न करता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेणार्‍या धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या या व्यथा आणि वस्तुस्थिती या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. या बैठकीत प्रस्तावित करताना जिल्हाधिकार्‍यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई, पिक विमा याचे शंभर वाटप व कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी झाल्याचे आकडे सादर केले. त्याचा धागा पकडत बोलताना श्री.मुंड

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

इमेज
परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष पुस व पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बीड दि.12.......... परळी वैजनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणात केवळ 17 टक्के पाणी साठा राहिल्याने परळी शहराला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, त्यासाठी संपुर्ण पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून परळीच्या पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पुस व 20 खेडी व पट्टीवडगाव व 9 खेडी पाणी पुरवठा योजनेचे वीज बील माफ करून या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.      बीड जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये आले असता ना.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. वाण धरणावर परळी शहरासह नागापूर, आस्वलांबा, दौनापूर, टोकवाडी डाबी या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच वैद्यनाथ कारखान्याला येथुनच पाणी पुरवठा होतो. सद्या धरणात
इमेज
मुख्यमंत्री दौरा: सकारात्मक पाउल... ! बीड जिल्ह्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद बीड /प्रतिनिधी ........               बीडमध्ये भीषण दुष्काळ असून त्यासाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सध्या खरीप हंगामावर संकट असल्याचेही म्हटले. बीडमध्ये दुष्काळ दौर्‍यादरम्यान घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.             बीडमध्ये दुष्काळ असून अन्न्याधान्याच्या नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. जिथे जिथे पाणी नसेल तिथे चारा छावण्या सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी एकूण 2162 योजना मान्य केल्या असून बीडसाठी 24 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री दौरा : दुष्काळी परिस्थितीत पदरात काही पडणार का?

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद! ● शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करावे व हेक्टरी अधिकाधिक मदत देण्याची गरज ● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी ............           संपुर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे.यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने सर्वच समाजघटक या भयावह परिस्थितीत होरपळून निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख नेतेमंडळी दुष्काळ पहाणी दौरा करत आहेत.बीडच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दौरा करून पाहिली आहे.आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१२ रोजी बीड दौऱ्यावर येत आहेत.मुख्यमंत्र्यां च्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.          राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त  अहवालानुसार गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले.या मध्ये बीड जिल्हयातील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळी भा

*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महोत्सव*

इमेज
*परळीत रविवारी श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव* ● कीर्तने व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ..       परळी पंचक्रोशीतील महान संत श्रीगुरु संत सोपानकाका महाराज यांचा  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि. ११ रोजी आहे. त्यानिमित्ताने परळीत  मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने व विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायातील व उखळीकर भजनी फडावरील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.       श्रीगुरु संत सोपानकाका महाराज मंदिर येथे आज रविवार दि. ११ रोजी  ७१ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात सकाळी ११ ते १ जगमित्रनागा मंदिर येथे हभप ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे पूजेचे किर्तन होणार आहे. दुपारी २ ते ४ संत सोपानकाका महाराज मंदिर येथे महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदजी महाराज कैलास आश्रम वेरूळ यांचे तर रात्री ९ते११ हभप परमेश्वर महाराज जायभाये आळंदी यांचे किर्तन होणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभरात होणार आहेत. तरी या कार्यक्रमाल

परळीकरांचा संगीतमय दिवाळी पाडवा

इमेज
वैद्यनाथाच्या उत्तर पायर्‍यांवर रंगतदार संगीत मैफिल! ● परळीकरांचा संगीतमय  दिवाळी पाडवा ● छायाचित्र व व्हिडिओ : राजेंद्र सोनी, परळी वैजनाथ . परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  दि.4 -          श्री.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज  दि.8 ऑक्टोबर,गुरुवार रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य तथा सुप्रसिद्ध गायक  पं.आनंद भाटे यांच्या  गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वैद्यनाथाच्या उत्तर पायर्‍यांवर रंगतदार संगीत मैफिल सुरु आहे.    पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य म्हणून सर्व परिचित असलेले प.आनंद भाटे यांच्या भक्तीगीत आणि अभंगवाणीची मेजवानी परळीकरांना दिवाळीनिमित्त भेटली  आहे. विविध भक्तीगीते व भावगीते सादरीकरणात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. उत्तर पायर्‍या भाविकांनी फुलून गेल्या आहेत.

अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*

इमेज
* अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*  ● _मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....           अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.      सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे.  या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
इमेज
परळीत नवरात्रोत्सवाची लगबग; ३० दुर्गोत्सव मंडळे !  आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई    परळी वैजनाथ /प्रतिनिधी . .............        नवरात्रोत्सव काळातील विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी  मंडळे सध्या  प्रयत्नशील आहेत. परळीत ३० दुर्गोत्सव मंडळे असणार आहेत. मात्र तूर्तास परवाना प्रक्रिया सुरू आहे. परळीतील ३०  मंडळे  या परवान्याच्या  प्रतिक्षेत आहेत. आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई  सुरू असल्याचे दिसून येत आहे.         सध्या नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. शहरात दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून २३ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.  शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाणे या हद्दीत मंडळांना ध्वनिक्षेपक, मिरवणूक आदी परवानग्या देण्यात येतील. मंडळांनी वीज जोडणीबाबतचा अधिकृत परवाना वीज वितरण कंपनीकडून घेणे बंधनकारक आहे. तसेच धर्मादाय कार्यालयाकडील नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच पोलीसांकडील परवाना मंडळांना प्राप्त होतो. सध्या या परवानगीच्या प्रक्रियेत सर्व गणेश मंडळे आहेत.         पोलीसांनी दुर्गोत्स

*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती*

इमेज
*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती* औरंगाबाद दि 9 ----  डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी  आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फोजिया खान, आ. राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रकाश गजभिये, विजय भाम्बळे, सौ. चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, कदिर मौलाना आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्य रितीने चालली होता. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त

इमेज
अन्यायकारक व   चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त  ! **_राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....    ऐन सणासुदीच्या तोंडावर  अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त   झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.     माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरक

_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_ *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*

इमेज
_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_  *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*  परळी वैजनाथ। प्रतिनिधी ...      तालुक्यातील बोरखेड येथे महान संत ह.भ.प. वै. दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त भागवतमर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे.

मराठवाडा आणि राज्यात अभुतपुर्व, भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनामुख्यमंत्री गप्प का ?* - धनंजय मुंडे

इमेज
* मराठवाडा आणि राज्यात अभुतपुर्व, भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनामुख्यमंत्री  गप्प का ?*  * _तातडीने दुष्काळ जाहिर करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी_* मुंबई दि.07...............मराठवाड्या सोबतच संपुर्ण राज्यात या वर्षी अभुतपुर्व आणि भिषण दुष्काळाची परिस्थिती असतांना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला असुन सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहिर करा अशी अग्रही मागणी त्यांनी केली आहे. मराठवाड्यात या वर्षी पावसा आभावी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांची पेरणी वाया गेली असुन, आलेली थोडीफार पीके ही करपुन आणि विविध रोगांनी ग्रासली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती सोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न आता पासुनच गंभीर बनला आहे. राज्यातील या भिषण परिस्थितीबद्दल धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी ब

आजचे दै. पुढारी परळी वैजनाथ वार्तांकन ....

इमेज
आजचे दै. पुढारी परळी वैजनाथ वार्तांकन 

*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*

इमेज
* पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .....        तालुक्यातील पांगरी येथे 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला असून श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच  महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा या महोत्सवात सादर होणार आहे.           पांगरी येथील स्व. उर्मिलाबाई धोंडीराम मुंडे यांच्या पाचव्या  पुण्यस्मरणानिमित्त 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भागवतमर्मज्ञ ह. भ. प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद भागवत संहिता पारायण होणार आहे. तसेच दि. १९, २० व २१ आॅक्टोबर  रोजी किर्तन महोत्सवात सर्वश्री ह. भ. प .प्रभाकर महाराज झोलकर, ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे, ह. भ. प.विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर , पंढरपूर येथील संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे फड प्रमुख  ह. भ. प. प्रभाकर दादा बोधलेयांची किर्तनसेवा होणार आहे.             या महोत्सवात वारकरी संप्रद

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!*

इमेज
*भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!* ● *_परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी_*  ● परळी वै.।प्रतिनिधी      भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी देण्यात आली आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अॅड. अरुण पाठक यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.      अॅड. अरुण पाठक यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजप मध्ये सक्रिय काम केलेले आहे. भाजपा विद्यार्थी आघाडी व पक्ष संघटनेने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उत्तुंग नेतृत्वांकडे पाहून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात नव्या पिढीतील असंख्य युवक सक्रिय झाले त्यामध्ये परळीचे अॅड. अरुण पाठक यांनी ना. पंकजाताई मुंडे, आ.योगेश आण्णा टिळेकर, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, यांच्या  नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने दिलेले काम केले आहे.       नुकतीच त्यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्तीपत्र आ.योगेश आण्णा टिळे

टोकवाडीत स्वच्छता अभियान !

इमेज
टोकवाडीत स्वच्छता अभियान ! ●राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य ● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा संदेशाचे पालन करून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सौ.मुंडे म्हणाल्या.  परळी तालुक्यातील टोकवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सौ.मुंडे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आचार व विचारातून चळवळ उभाकरुन भारताला जुलमी इंग्रजी राजवटीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. माजी पंतप्रधान लालबाहदूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. मिठाचा सत्याग्

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*

इमेज
*राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच त्या विद्यार्थ्यांवर अन्याय - धनंजय मुंडे* *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी* मुंबई दि 4 ...... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने ही स्थगिती आली आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सहाययक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून सध्या गोंधळ सुरू आहे... अनेक विद्यार्थ्यांनी तीन- तीन वर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली.. परीक्षेचा निकालही आला..परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्याच्या नियुक्तीची शिफारसही mpsc ने राज्य सरकारकडे केली. मात्र नियुक्ती होण्याआधीच  त्यावर न्यायालयाकडून स्थगिती आली. न्यायालयाच्या या स्थगितीचा. फटका बसलेली ही 24 वर्षीय वर्षा बराटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्षा पुण्यात नोकरीसाठ

पेट्रोल आणि डिझेलचे भाव: _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा- धनंजय मुंडे

इमेज
*चार वर्ष लुट केल्यानंतर आता दर कमी करणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण-धनंजय मुंडे* _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा_ मुंबई दि.04.............केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भावअल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.  गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असतांना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. ----------------------------------------------

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

इमेज
*धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा ; जगमित्र सुतगिरणी प्रकरणी प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या अंमलबजावणीस न्यायालयाची  स्थगिती* अंबजोगाई दि.04.................संत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट बाबत अंबाजोगाई न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालास कोर्टाने सदर बाबीच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे.      अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सुतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमुद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले होते.       या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करतांना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली,  गृहमंत्रालयाकडुन या बाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प

*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची गोपीनाथगडाला भेट !*

इमेज
*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची  गोपीनाथगडाला भेट !* परळी वैजनाथ। प्रतिनिधी. ...           महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा अध्यात्मिक क्षेत्रातील जनमान्य व्यक्तीमत्व असलेल्या जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांनी गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली. 

video...... _बघा पाउस न पडण्याची काय आहेत खरी कारणे. ......._

इमेज
Watch this video  _बघा पाउस न पडण्याची काय आहेत खरी कारणे. ......._ ●  *सोशल मीडियातून तुफान लोकप्रिय ठरत असलेले *हे बाबा* काय म्हणतायत व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एकदा बघाच....* ●