हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे



हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे

परळी (प्रतिनिधी)
 
       भारताचे माजी पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी .मुंडे (सर )यांनी केले

      परळीतील संपर्क कार्यालयांमध्ये डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉ. मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते फारुख भाई ,महेमुद भाई ,बाबा शेख , इलियास भाई काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जम्मू सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजिद, गफार भाई बागवान ,शेख फैय्याज ,मतीन मणियार, शेख सिकंदर, शेख जावेद, मुईज नवाब आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

       पुढे बोलताना प्रा .टी.पी .मुंडे (सर )म्हणाले की डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जीवन तरुणांना प्रेरणा देणारे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे त्यांच्यामुळेच आज देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली असून देशातील नावाजलेल्या संस्था आय आय टी, आई आई एम ,यूजीसी इत्यादी संस्था देशाला देण्याचे काम डॉ. मौलाना अबुल कलाम यांनी केली आहे या संस्थांच्या माध्यमांमधून शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचा बदल घडत असून यामध्ये गुणवंत विद्यार्थी आपल्या देशाचे नाव परदेशात जाऊन सुद्धा उज्वल करत आहेत
डॉ.मौलाना अबुल कलाम हे एक उत्कृष्ट पत्रकार आणि लेखक सुद्धा होते त्यांनी एकूण 12 पुस्तके लिहिली भारतीय स्वातंत्र्याच्या लढण्यामधील ते एक अग्रगण्य म्हणून नावारूपास आले होते त्यांनी या देशाला   हिंदू-मुस्लिम एकतेचीे शिकवण दिली असेही प्रा. टी.पी. मुंडे ( सर) म्हणाले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !