इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*


*अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!* 

● _मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ ● 


परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....          अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. 

    सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठेवणे आवश्यक आहे.  या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे या मागणीसाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी सायंकाळी ७ वा. गणेशपार पासुन  पाॅवर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार आहे.
    या चुकीच्या भारनियमन व अन्यायकारक सरकारी धोरणांविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी कंदील मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....