मुख्यमंत्री दौरा : दुष्काळी परिस्थितीत पदरात काही पडणार का?


मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद!

● शैक्षणिक शुल्क पूर्णतः माफ करावे व हेक्टरी अधिकाधिक मदत देण्याची गरज ●

परळी वैजनाथ /रविंद्र जोशी ............
          संपुर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे.यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने सर्वच समाजघटक या भयावह परिस्थितीत होरपळून निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रमुख नेतेमंडळी दुष्काळ पहाणी दौरा करत आहेत.बीडच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दौरा करून पाहिली आहे.आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१२ रोजी बीड दौऱ्यावर येत आहेत.मुख्यमंत्र्यां च्या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

         राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त  अहवालानुसार गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले.या मध्ये बीड जिल्हयातील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळी भागातील जनता , शेतकरी, व नागरीकांच्या वस्तुस्थिती दर्शक मतांचा व मागण्यांचा  सरकारने विचार करणे गरजेचे आहे.२०१३-१४ च्या नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकारने एनडीआरएफचे निकष बाजुला घेऊन हेक्टरी २५ हजार रूपये मदत दिली होती, यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने हेक्टरी ५० हजार रू. मदत द्यावी अशी मागणी विरोधीपक्षांसह शेतकऱ्यांतूनही जोर धरू लागली आहे.
         मराठवाड्यात कापूस हे मुख्य पिक आहे.मागील वर्षी बोंडअळी मुळे शेतकर्‍यांचे संपुर्ण पिक गेले होते. यावर्षी दुष्काळाचे पुन्हा त्यांच्यासमोर नव्याने संकट आले आहे. मागील वर्षीची बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पावसाअभावी अगोदरच निर्माण झालेल्या जलसंकटामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती आहे. खरीप हंगाम असातसाच गेला आता रब्बीचे तर स्वप्नच भंगलेले आहे. अशा भिषण व भयावह परिस्थितीत मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यातून तरी काही सकारात्मक व धीर देणाऱ्या बाबी पदरी पडतील का? असा भाबडा आशावाद शेतकरी, शेतमजूर, वंचित, उपेक्षित घटक व्यक्त करीत आहे.

@@@@
 शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत..........!

       दुष्काळाची दाहकता आहे.निसर्गाने साथ दिली नाही. तरी सरकार जनतेसोबत आहे. दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी स्वतः शेतकऱ्यांना सोबत घेऊन बांधावर गेले.पाहणी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळवून घेणार आहोत. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध आहे.
                 - ना. पंकजा मुंडे
                   पालकमंत्री, बीड. 

@अ@@
तर अधिवेशन चालु देणार नाही...!

           राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत देण्याची गरज आहे.2013 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने हेक्टरी 25 हजार रूपये मदत दिली होती. यावेळी त्या वेळेपेक्षा अधिक बिकट परिस्थिती असल्याने 50 हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही.
         - धनंजय मुंडे
 विधान परिषद विरोधी पक्षनेते.
                            ●●●●●●●●●●●●●●
@@@@
 सामान्यांचा आशावाद........!
   ●दुष्काळी भागातील जनतेचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने तातडीने रोजगार हमी योजनेचे कामे सूरू करावीत.
●दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे केवळ परिक्षा शुल्क माफ न करता संपुर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावे.
● दुष्काळी भागात तातडीने जनावरांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा.
 ● शेतकर्‍यांचे चालु पिक कर्ज व वीज बिलाची संपुर्ण थकबाकी माफ करावी.
● तातडीने टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत.
                         ●●●●●●●●●●●●●●

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !