धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

*धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा
; जगमित्र सुतगिरणी प्रकरणी प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या अंमलबजावणीस न्यायालयाची  स्थगिती*

अंबजोगाई दि.04.................संत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट बाबत अंबाजोगाई न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालास कोर्टाने सदर बाबीच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे.

     अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सुतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमुद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले होते.

      या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करतांना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली,  गृहमंत्रालयाकडुन या बाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प्रकरणी कोणतीही नोटीस न मिळाल्याने प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच हा आदेश एकतर्फी असल्याचे ही म्हटले होते.

    अर्जदारांचे म्हणणे ऐकुन घेवुन तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक व सरकारी पक्षाची बाजु ऐकुन घेत न्यायालयाने प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या दिलेल्या निकाला संबंधी सदर अंमलबजावणीस स्थगिती देत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

     या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या वतीने अ‍ॅड.अण्णासाहेब लोमटे व अ‍ॅड.अशोक कवडे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !