इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*


*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!* 

परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .....
       तालुक्यातील पांगरी येथे 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला असून श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच  महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा या महोत्सवात सादर होणार आहे. 


         पांगरी येथील स्व. उर्मिलाबाई धोंडीराम मुंडे यांच्या पाचव्या  पुण्यस्मरणानिमित्त 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भागवतमर्मज्ञ ह. भ. प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद भागवत संहिता पारायण होणार आहे. तसेच दि. १९, २० व २१ आॅक्टोबर  रोजी किर्तन महोत्सवात सर्वश्री ह. भ. प .प्रभाकर महाराज झोलकर, ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे, ह. भ. प.विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर , पंढरपूर येथील संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे फड प्रमुख  ह. भ. प. प्रभाकर दादा बोधलेयांची किर्तनसेवा होणार आहे.
           या महोत्सवात वारकरी संप्रदायातील हभप पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांच्या अशिर्वचनाखाली तसेच हभप बापूसाहेब महाराज उखळीकर, हभप गणेश महाराज उखळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार असून या महोत्सवात किर्तनकार,  गुणीजन, भजनी मंडळी, यांची उपस्थिती लाभणार आहे. पांगरी से. स. सो. चे माजी चेअरमन  धोंडीराम मुंडे , वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिर पांगरी येथे सर्व कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात होणाऱ्याकार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अॅड. श्रीनिवास मुंडे, रामधन मुंडे, नंदकिशोर मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!